खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

आई वडील शेतात गेल्यानंतर १९ वर्षीय तरुणाने दोरीने गळफास घेऊन आत्महत्या

नंदगाव येथील घटना, बापाने मुलाचा लटकलेला मृतदेह पाहून फोडला हंबरडा

अमळनेर(प्रतिनिधी) आई वडील शेतात गेल्यानंतर १९ वर्षीय तरुणाने दोरीने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील नंदगाव येथे काल दुपारच्या सुमारास उघडकीस आली आहे. बापाने मुलाचा लटकलेला मृतदेह पाहून हंबरडा फोडला. आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात असून याप्रकरणी अमळनेर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी याबाबत दिलेली अधिक माहिती अशी की, तालुक्यातील नंदगाव येथील गोकुळ रघुनाथ पाटील व त्यांच्या पत्नी सिमाबाई हे नेहमीप्रमाणे दिनांक २८ रोजी शेतात गेले होते. व त्यांचा मुलगा योगेश गोकुळ पाटील (वय १९) हा एकटाच घरी होता. दुपारी दोन वाजता गोकुळ पाटील हे शेतात फवारणी करून परत आले आले व गावातील सुकदेव पाटील यांच्या गोठ्यात फवारणीचा पंप ठेवण्यासाठी गेले असता त्यांना योगेशने सुती दोरीच्या सहाय्याने लोखंडी अँगलला गळफास घेतल्याचे दिसून आले. ते दृश्य पाहून त्यांनी हंबरडा फोडल्याने शेजारी गोळा झाले. त्यांनी योगेशला खाली उतरवत खाजगी वाहनाने अमळनेर ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. याप्रकरणी अमळनेर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास एएसआय संजय वना पाटील हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button