खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

मंगळग्रह मंदिरावर महिलेच्या गळ्यातून १८ हजाराची सोन्याची चेन लांबवली

अमळनेर (प्रतिनिधी) चोरटय़ाने गर्दीचा फायदा घेऊन मंगळग्रह मंदिरावर दर्शनासाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातून १८ हजार रुपये किमतीची सोन्याची चेन लंपास केल्याची घटना २५ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नारायण खोडके व जयश्री खोडके हे दाम्पत्य २५ रोजी मंगळग्रह मंदिरावर दर्शनासाठी गेले होते. चोरट्याने १० ग्राम वजनाची सोन्याची चेन चोरून नेली. अमळनेर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल सुनील पाटील करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button