खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

मारवड पोलिसांनी छापा टाकून निंभोरा येथे सट्टा घेणाऱ्या एकाला रंगेहाथ पकडले

अमळनेर (प्रतिनिधी) मारवड पोलिसांनी छापा टाकून तालुक्यातील निंभोरा येथे सट्टा घेणाऱ्या एकाला रंगेहाथ पकडून गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी याबाबत दिलेली अधिक माहिती अशी की, सपोनि शितलकुमार नाईक यांना निंभोरा येथे सट्टा जुगाराचा अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाईसाठी रवाना केले असता निंभोरा येथे जि.प. शाळेच्या बाजूस असलेल्या टपरीच्या आडोश्याला एक इसम लोकांकडून सट्टा घेताना दिसून आल्याने त्याच्यावर छापा टाकून रंगेहाथ पकडले. त्यास नाव विचारले असता त्याने रवींद्र बाबूलाल बाविस्कर (वय ३९, रा. निंभोरा) असे सांगितले. त्याच्याकडे सट्टा जुगाराचे साहित्य व सट्टा लावण्यासाठी घेतलेले ३७० रुपये मिळून आले. त्यावरून मारवड पोलिसांत मुं.जू. १२ अ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हे कॉ संजय पाटील हे करीत आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button