खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत अमळनेर मतदार संघासाठी 87 लाखांचा निधी-आ शिरीष चौधरी

ग्रामिण भागातील अनु जाती वस्त्याध्ये होणार उल्लेखनीय विकासकामे,सामाजिक न्याय मंत्र्यांचे मानले आभार..अमळनेर(प्रतिनिधी)नागरी व ग्रामिण भागातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमध्ये मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनें तर्गत जळगाव जिल्ह्यासाठी 9 कोटी 71 लाख मंजूर झाले असून त्यापैकी अमळनेर विधानसभा मतदार संघासाठी 87 लाख मंजूर असल्याची माहिती आ शिरीष चौधरी यांनी दिली.
सदर कामांसाठी आ चौधरी यांचा दिनांक 5 जुले 2017 पासून पाठपुरावा सुरु होता,यासाठी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले व सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचीही भेट त्यांनी घेतली होती,अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन तब्बल 87 लाखांचा निधी मंजूर झाल्याने ग्रामिण भागात अनु-जाती वस्त्यां मध्ये उल्लेखनीय विकासकामे होणार आहेत.या मंजुरी बद्दल आ चौधरीं यांनी सामाजिक न्याय मंत्री ना. बडोले व राज्यमंत्री ना कांबळे यांचे विशेष आभार व्यक्त केले आहेत.

अशी होणार विकासकामे

अमळगाव येथे अनु-जाती वस्तीमध्ये सामाजिक सभागृह रस्ता काँक्रीट शौचालय बांधणे 10 लाख, पिळोदे येथे अनु-जाती वस्तीमध्ये सामाजिक सभागृह, रस्ता काँक्रीटीकरणं व शौचालय बांधणे 10 लाख, जळोद येथे अनु-जाती वस्तीमध्ये सामाजिक सभागृह, रस्ता काँक्रीटीकरणं व शौचालय बांधणे10 लाख, जिराळी येथे अनु-जाती वस्तीमध्ये सामाजिक सभागृह, रस्ता काँक्रीटीकरणं व शौचालय बांधणे 10 लाख, फापोरे येथे अनुसूचित जाती वस्तीत रस्ता काँक्रीट करणे 3 लाख,इंदापिंप्री येथे अनुसूचित जाती वस्तीत रस्ता काँक्रीटीकरणं करणे 5 लाख, चोपडाई येथे अनुसूचित जाती वस्तीत रस्ता काँक्रीटीकरणं 7 लाख,डांगर अनुसूचित जाती वस्तीत रस्ता काँक्रीट करणे 15 लाख,रणाईचे येथे अनुसूचित जाती वस्तीत रस्ता काँक्रीटीकरणं करणे 5 लाख,अंचलवाडी येथे अनुसूचित जाती वस्तीत रस्ता काँक्रीटीकरणं करणे 7 लाख,लोंढवे येथे अनुसूचित जाती वस्तीत रस्ता काँक्रीटीकरणं करणे 5 लाख, आदी विकासकामे होणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button