अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करणार्‍या विघ्न “संतोषी”ला पाच वर्षाचा कारावास

पीडित मुलीने हाताला चावा घेऊन नराधमाच्या तावडीतून स्वतःची केली होती सुटका

अमळनेर (प्रतिनिधी) दुपारी मैत्रिणी सोबत अभ्यास करणाऱ्या त्या कोवळ्या जीवाला बोलावून कुरकुरे घेण्याच्या बाणाने तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विघ्न संतोषीला न्यायालयाने पाच वर्षाचा कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. अमळनेर जिल्हा व सत्र न्यायालयाने दिलेल्या या निकालाने पीडित अल्पवयीन मुलीला आणि तिच्या कुटुंबाला न्याय मिळाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पारोळा तालुक्यातील देवगाव येथील संतोष मुरलीधर पाटील (वय ५०) याने २ ऑगस्ट २०१८ रोजी दुपारी दुपारी २ वाजेच्या सुमारास पीडित मुलगी व तिची मैत्रीण ह्या दोन्ही घरात अभ्यास करीत असतांना आरोपीने पीडित मुलीला बोलावून तिला दहा रुपये दिले व दुकानावरून कुरकरे घेऊन ये असे सांगितले.पीडित मुलगी दुकानावरून एक कुरकुरे घेऊन आली व उर्वरीत पाच रुपये देण्यासाठी आरोपीकडे गेली असता आरोपीने पीडित बलिकेला घरात बोलावून घेतले व तुझे सर्व कपडे काढून तू माझ्या जवळ झोप असे सांगत हात पकडून तिला ओढू लागला.मात्र पीडित मुलीने त्याच्या हाताला चावा घेतला व त्याच्या घरातून बाहेर पळ काढला.याबाबत तिने घरी असलेल्या आजी जवळ सर्व हकीकत सांगितली. याबाबत पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

खटल्यात ८ साक्षीदार तपासले

या खटल्यात ८ साक्षीदार तपासण्यात आले होते.त्यात पीडित मुलगी,सरकारी पंच,आजी,दुकानदार व शेजारी व तपास अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी रफिक शेख यांची साक्ष महत्वाची ठरवत जिल्हा न्यायाधीश वर्ग १ एस बी गायधनी यांनी आरोपीस भादवी कलम ३५४ मध्ये पाच वर्षे कारावास व ५०० रुपये दंड दंड न भरल्यास ६ महिने शिक्षा,३५४(अ),लैंगिक गुन्हा बाल संरक्षण कायदा २०१२ चे कलम ८ व १२ मध्ये तीन वर्षे शिक्षा व ३०० रुपये दंड दंड न भरल्यास तीन महिने शिक्षा तसेच अनुसूचित जाती जमाती (अत्याचारास प्रतिबंध सुधारणा)अधिनियम २०१५ चे कलम ३(डब्लू)(i) नुसार ५ वर्ष शिक्षा व ५०० रुपये दंड दंड न भरल्यास ६ महिने शिक्षा अशी शिक्षा सुनावली. सरकारी वकील किशोर रघुनाथ बागुल यांनी युक्तिवाद केला.पैरवी अधिकारी उदयसिंह साळुंखे,पोलीस कॉन्स्टेबल हिरालाल पाटील,नीतीन कापडणे, राहुल रणधीर यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *