केंद्राने दुष्काळ नियोजन मार्गदर्शिकेची अंमलबजावणी करावी व गंभीर दुष्काळ- ४३ हजार हेक्टर सिंचनासाठी पंतप्रधान सिंचन योजनेत पाडळसे घेण्याची मागणी… अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यासह तापी प्रकल्पातंर्गत येणाऱ्या अमळनेर पारोळा,चोपडा,शिंदखेडा, धुळे तालुक्यांचा समावेश गंभीर दुष्काळ यादीत केला असल्याने कायमस्वरुपी दुष्काळावर मात करण्यासाठी केंद्र शासनाने तयार केलेल्या २०१६ च्या दुष्काळ नियोजनाबद्दल मार्गदर्शिकेनुसार पंतप्रधान सिंचन योजनेत निम्न तापी प्रकल्प पाडळसेच्या समावेश करावा अशी मागणी माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. नुकताच निधीची हमी नसल्याचे आयोगाने स्पष्ट केल्यानंतर कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी शासनाच्या मार्गदर्शिकेतील मुद्द्यांवर बोट ठेवले आहे.
अमळनेर विधानसभा मतदारसंघ सतत अवर्षण प्रवण ग्रस्त असून चार वर्षांपासून मान्सून ७५ टक्क्यापेक्षा कालावधीच्या कमी पर्जन्यमान आणि ३ ते ४ आठवड्यां पेक्षा जास्त काळ पर्जन्यमानात खंड पडल्यामुळे पीक परिस्थितीवर विपरित परिणाम झाला असून जी पीके या विपरित परिस्थितीत शेतकऱ्यांनी टिकवून ठेवली होती, तीही वेगवेगळ्या किड व रोगांनी बाधित झाली असल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. शासनाने गंभीर दुष्काळ जाहीर करुन तातडीच्या उपाययोजना जमीन महसुलात सुट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन शेतीशी निगडीत कर्जाच्या बसुलिस स्थगिती, कृषी पंचाच्या चालु वीज बिला ३३ ५०% इतकी सुट विद्यार्याच्या परीक्षा शुल्कात माफी,आवश्यक तेथे टँकर्स चा वापर तातडीच्या आवश्यक तात्पुरत्या उपायोजना केल्या आहेत मात्र अमळनेर तालुका कायमस्वरूपी दुष्काळी परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी निम्न तापी प्रकल्प पाडळसे होणे गरजेचे आहे आयोगाने १२ ऑक्टोबर २०११अन्वये या प्रकल्पासाठी केंद्रीय जल तत्वतः मान्यता देऊन ८ फेब्रुवारी २०१३ ला अंतिम मान्यतेसाठी प्रस्ताव सादर केला होता २८ ऑगस्ट २०१८ रोजी केंद्रीय जलआयोगाकडून ५ उपसा सिंचन योजनांसह २७५१.०५ कोटीस मान्यता दिली मात्र याच बैठकीत पंतप्रधान सिंचन योजनेत निधी मिळण्याची हमी नाही असे
निर्देशित करुन राज्यशासनाने निधी देवून प्रकल्पाचे काम बंद करू नये असे सुचित केले आहे.नियोजनानुसार राज्य शासनाकडून दरवर्षी ४०० कोटी निधी उपलब्ध झाल्यास प्रकल्पाचा प्रथम टप्पा २०२३- २४ मधे पुर्ण होईल. परंतु निधी अभावी सद्यस्थितीत प्रकल्पाचे काम बंद आहे.
मात्र भारत सरकारने कृषी सहकार व शेतकऱ्यांचे कल्याण विभा गाने २८ डिसेंबर २०१६ मध्ये दुष्काळ नियोजना बद्दल मार्गदर्शि का तयार करुन राज्य शासनाच्या तातडीच्या आवश्यक अशा परंतु ” तात्पुरत्या स्वरुपाच्या उपाययोजना भविष्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण होवू नये म्हणून विविध योजना एकत्रित करुन पंतप्रधान कृषी सिंचन योजनेची निर्मिती केली आहे ही योजना दुष्काळ कायम स्वरुपी नाहीसा करण्यासाठी एक मैलाचा दगड ठरणारी आहे.
त्यामुळे निम्न तापी प्रकल्प पाडळसेचा पंतप्रधान सिंचन योजनेत समावेश करुन तातडीने निधी उपलब्ध करुन द्यावा” त्यामुळे जळगांव जिल्ह्यातील धुळे जिल्ह्यातील एकूण ४३,६०० हेक्टर सिंचन क्षेत्रापैकी जळगांव जिल्ह्यातील अमळनेर व पारोळा तालुक्यातील २९,५४५ हेक्टर व धुळे जिल्ह्यातील २४०९ हेक्टर असे एकूण ३१९५४ हेक्टर क्षेत्र सतत अवर्षण प्रवण क्षेत्राला शेती सिंचनाचा लाभ होणार आहे असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनाच्या प्रति- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , महसुल मंत्री चंद्रकांत पाटील जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, स्थानिक लोक प्रतिनीधी.आ.स्मिता वाघ आ.शिरीष चौधरी, मुख्य सचिव,प्रधान सचिव, आयुक्त, जिल्हाधिकारी,उपविभागीय अधिकारी, तहसिल दार यांना पोर्टल, मेल, रजिष्टर,पोष्ट,व व्हाट्सप, व समक्ष यांना देण्यात आल्या आहेत.