खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

प्र. डांगरी येथे पुतण्याने दारूच्या नशेत वृद्ध काकाला विटेने केली बेदम मारहाण

अमळनेर (प्रतिनिधी) पुतण्याने दारूच्या नशेत वृद्ध काकाला विटेने मारहाण केल्याची घटना तालुक्यातील प्र. डांगरी येथे घडली. याप्रकरणी मारवड पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांनी याबाबत दिलेली अधिक माहिती अशी की, महादू शिवराम कोळी (वय ६०) रा. प्र. डांगरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक ५ जुलै रोजी संध्याकाळी ७:३० वाजता ते घराच्या ओट्यावर बसले असताना त्यांचा पुतण्या विलास सोनू कोळी हा दारूच्या नशेत आला व त्यांना खाली ओढून शिवीगाळ करत विटेने नाकावर, तोंडावर, मारहाण करून गंभीर दुखापत केली. तसेच त्यांच्या पत्नी, मुली आणि बहिणीस अश्लील शिवीगाळ करत पोलिसांत तक्रार केल्यास जिवे मारण्याची धमकी फिर्यादीला दिली. ते गंभीर जखमी झाल्याने त्यास कुटुंबीयांनी खाजगी रुग्णालयात दाखल केले. उपचार झाल्यानंतर त्यांनी मारवड पोलीसात तक्रार दिली असून विलास सोनू कोळी याच्या विरुद्ध भादवि कलम ३२६, ३२४, २९४, ५०४, ५०६ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पीएसआय विनोद पाटील हे करीत आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button