खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

आयडीबीआय बँक ते कोंबडी बाजार पर्यंत रस्त्याची दुरवस्था, पायी चालणेही कठीण

तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी यासाठी अमळनेर दाऊदी समाजाने मुख्याधिकारी यांना दिले निवेदन

अमळनेर (प्रतिनिधी) न्यू प्लॉट भागातील आयडीबीआय बँकपासून ते कोंबडी बाजार पर्यंतच्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. पायी चालणेही कठीण झाले आहे. तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी यासाठी अमळनेर दाऊदी समाजाने मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना निवेदन दिले आहे.
शहरातील हा रस्ता अत्यंत वर्दळीचा आणि मुख्य बाजार पेठेस जोडणारा असताना हा रस्ता वाहतुकीस व पादचाऱ्यांच्या चालण्याकरिता योग्य राहिलेला नसून अनेक मोठे खड्डे ठिकठिकाणी पडलेले आहे, पावसामुळे खड्यात पाणी साचून डबके तयार झाले आहे. दिनांक 17 जुलै पासून बोहरा समाजाचे मोहरमचे सण सुरुवात होत असल्याने या रस्त्यावरून बोहरा समाज बांधवांचा जास्तीत जास्त वापर असतो. तरी सदर रस्ता त्वरित दुरुस्त करून सहकार्य करावे अशी विनंती शे.एहसानभाई बुरहानी व समाज बांधवांनी केली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button