खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

सप्तशृंगी गडावरून परतणारी बस दरीत कोसळली, मुडीची महिला मृत, १२ महिला जखमी

भल्या सकाळी प्रवासी महिलांच्या किंकाळ्यांनी गडावरील दरी हादरली

अपघाताची माहिती मिळताच मंत्री अनिल पाटील मुंबईहून तातडीने नाशिक येथे रवाना

अमळनेर (प्रतिनिधी) सप्तशृंगी गडावरून खामगाव परतणारी बस गडावरून खाली उतरताना दरीत कोसळून झालेल्या अपघातात अमळनेर तालुक्यातील मुडी येतील महिला एका महिलेचा मृत्यू तर इतर १२ महिला जखमी झाल्या. हा अपघात बुधवारी पहाटे ६:३० च्या सुमारास घडला आणि प्रवाशांचे काळीज धस्स झाले. प्रवासी महिलांच्या किंकाळ्यांनी गडावरील दरी हादरून गेली.
बुधवारी पहाटे ६:३० च्या सुमारास हा अपघात झाला. सप्तश्रृंगी गडावरुन बुलढाण्यातील खामगाव येथे जात असताना बस (क्रमांक एम एच ४०, ए क्यू ६२५९) दरीत कोसळली. खामगाव डेपोची एसटी बस अपघातग्रस्त झाली. यावेळी बसमध्ये २२ जण प्रवास करत होते. १६ प्रवासी हे अमळनेर तालुक्यातील मुडी या गावचे असून गडावरील ४ प्रवासी आहेत. या अपघाताची माहिती मिळताच मंत्री अनिल पाटील यांनी मुंबईहून तातडीने नाशिक येथे नाशिक जिल्हा रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. रुग्णांवर सुरू असलेल्या उपचाराची माहिती घेतली. तसेच जखमींच्या उपचाराचा खर्च शासनामार्फत करण्यात येणार असून मोफत उपचार करण्याची सूचना रुग्णालय प्रशासनाला दिली.

अपघातात मृत आणि जखमी प्रवाशी

या अपघातात आशाबाई राजेंद्र पाटील (वय ५०) या महिलेचा मृत्यू झाला तर जखमींमध्ये प्रमिलाबाई गुलाबराव बडगुजर (वय ६५), संजय बळीराम भोई वय ६०), सुशीलाबाई सोनू बडगुजर वय २७), वच्छलाबाई साहेबराव पाटील (वय ६५) , सुशीलाबाई बबन नजान (वय ६४) ,विमलबाई अक्रत भोई( वय ५९), प्रतिभा संजय भोई (वय ४५),जिजाबाई साहेबराव पाटील (वय ६५), संगीता मांगुलाल भोई (वय ५६) , रत्नाबाई (पूर्ण नाव माहीत नाही) , सुरेखाबाई हिरालाल बडगुजर वय ४३ , संगीताबाई बाबूलाल भोई (वय ६०), भागीरथाबाई माधवराव पाटील (वय ५२) या महिला जखमी झाल्या आहेत. मंत्री अनिल पाटील यांनी मुंबईहून घटनास्थळी धाव घेतली असून प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.

मृत महिलेच्या कुटुंबियांना १० लाखाची मदत

अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेच्या नातेवाईकांना एसटी महामंडळातर्फे १० लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली असल्याची माहिती दिली. रुग्णांना तातडीने मोफत उपचार सुरू होऊन संपूर्ण व्यवस्था झाल्याने त्यांनी मंत्री अनिल पाटील यांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button