अमळनेर (प्रतिनिधी) मंत्री नामदार अनिल भाईदास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेर मतदारसंघातील दिव्यांग बांधवांना तीनचाकी सायकल, व्हीलचेअर,कुबड्या व कर्णयंत्र आदी साहित्य वाटप करण्यात आले. यामुळे दिव्यांग बांधवांना दिलासा मिळाला आहे.
आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत वाढदिवसाचे निमित्त साधून सुरवातीला दहा दिव्यांग बांधवाना हस्ते हे साहित्य ना अनिल पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.यात तीनचाकी सायकल, व्हीलचेअर,कुबड्या व कर्णयंत्र आदींचा समावेश आहे. यानंतर सुमारे चारशे ते पाचशे दिव्यांगाना साहित्य वाटप केले जाणार आहे.यावेळी जि प सदस्या सौ जयश्री अनिल पाटील, रणजित पाटील,देविदास पाटील,उमाकांत साळुंखे, तापीराम पाटील,बिरजू चौधरी उपस्थित होते.