डीएमएकडे अमळनेर नगरपरिषदचे बाकी 7 कोटीची केली मागणी
अमळनेर (प्रतिनिधी) राज्याच्या नगरपरिषद संचालनालयाचे संचालक किरण कुळकर्णी यांनी दि 8 जुलै रोजी अमळनेर नगरपरिषदेत धावती भेट दिली. यावेळी त्यांनी पालिकेच्या कामकाजाचा आढावा घेऊन समाधान व्यक्त केले.
यावेळी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस सोमचंद संदानशिव यांनी कुलकर्णी यांचा शाल, व बुके देऊन सत्कार केला. तसेच डीएमए कडे अंमळनेर नगरपरिषदचे 7 कोटी बाकी असल्याने ती अदा करण्याची मागणी केली. १०,२०,३०आश्वासित प्रगती योजना, डिसीपीएस जुनी पेन्शन योजना लागू करणे आदी मुद्दे मांडले, यावर संचालकानी केलेल्या मागण्याची दखल घेऊ असे आश्वासन दिले आहे. तसेच, या प्रसंगी अंमळनेर नगरपरिषदेच्या विविध विभागांनी आपापल्या विभागाचे उत्कृष्ट पणे सादरीकरण केल्याने संचालकानी कौतुक केले. मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांचेही त्यांनी कौतुक केले.यावेळी या वेळी बांधकाम अभियंता, अमोल भामरे, नगर अभियंता वाघ , पाणीपुरवठा अभियंता, बैसाणे , सत्यम पाटील, तोंडे, आरोग्य निरीक्षक युवराज चव्हाण, संतोष बिऱ्हाडे, हैबतराव पाटील, लाईट अभियंता प्रशांत ठाकूर उपस्थित होते.