मारहाणीत जखमीचा उपचारा दरम्यान मृत्यू ; खुनाचा गुन्हा दाखल, तिघे आरोपींना अटक…

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील जवळच असलेल्या शिरसाळे खुर्द येथे दिनांक ६ रोजी रात्री ९ वाजता आरोपी प्रदिप गिरधर गुरव याचे घरासमोर खाटेवर तीन लोक बसले असताना फिर्यादीचे पती दुचाकीवरून जात असताना दुचाकीचा धक्का खाटेला लागल्याने खाटेवर बसलेले अन्वर दिलावर खाटीक वय ३६, प्रदीप गिरधर गुरव वय ३४ अशोक रमेश भील्ल वय ३० सर्व रा.शिरसाळे खुर्द ता.अमळनेर यांनी फिरोज रशीद शेख वय ३६ यास छातीवर, पोटावर, मानेवर बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली अशी फिर्याद शबाना शेख फिरोज वय ३० रा.शिरसाळे खुर्द यांनी दिनाक १० रोजी पोलिसांत दिल्याने अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला होता.
या दरम्यान दिनांक ९ रोजीच जखमी फिरोज शेख वर अमळनेर येथे डॉक्टर अनिल शिंदे यांच्या दवाखान्यातुन अमळनेर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले होते तेथुन पुढील उपचारासाठी धुळे येथे जिल्हा रुग्णालयात दिनांक १० रोजी पाठविण्यात आल्यावर उपचारादरम्यान त्याच दिवशी रात्री ११:५५ वाजता फिरोज शेख चा मृत्यू झाल्याने मारवड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील यांना मयत फिरोज शेखची पत्नी शबाना शेख फिरोज यानी दिलेल्या पुरवणी जबाबवरून मारवड पोलीस ठाण्यात रात्री उशिरा अन्वर दिलावर खाटीक वय ३५, प्रदीप गिरधर गुरव वय ३५ अशोक रमेश भील्ल वय ३० सर्व राहणार शिरसाळे खुर्द ता. अमळनेर या आरोपी विरोधात भाग ५ गुन्हा र.नं. ४६/२०१८ चे कलम ३०२,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन्ही आरोपींना त्वरित अटक करण्यात आली असून पुढील तपास स्वता सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील व सहाय्यक फौजदार भागवत पाटील हे करीत आहेत, तर मयत फिरोज शेख याच्यावर शवविच्छेदन करून आल्यावर सायंकाळी उशिरा शिरसाळे गावात दफन विधी करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *