मांडळ गावाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही आ.सौ स्मिता वाघ यांचे सरपंच व ग्रामस्थांना आश्वासन…

अमळनेर-मांडळ  गावाने आपणास सतत प्रेम दिले असून या गावाशी एकप्रकारची आमची जुळली आहे,यामुळे गावातील कूण  समस्या सुटावी हाच आपला प्रयत्न आहे,त्यामुळे विकासाच्या दृष्टीकोनातून आपण निधी कमी पडू देणार नाही,अशी भावना आ सौ स्मिताताई वाघ यांनी मंडळ येथील सरपंच व ग्रामस्थांशी चर्चा करताना व्यक्त केली.
मांडळ येथील नवनिर्वाचित सरपंच यांनी गावातील विकासाच्या संदर्भात आमदार सौ वाघ यांना नुकतेच निवेदन दिले. त्यात स्मशानभूमीत सांत्वन शेड व रस्ता, गावातील वाढीव लोकसंख्या विचारात घेऊन पाण्याची मोठी टाकी ,अत्यन्त महत्त्वाचे म्हणजे मांडळ गावातुंन गेलेला मुंडीच्या फड पाटची संपूर्ण सफाई करून दुरुस्ती करणे व पाटाचे पाणी लौकी नाल्या पय॔न्त पोहचविणे, तसेच मांडळ फड नांल्याचे पाणी जे हेकंडवाडी गावापर्यंत येते येथून ते पाणी परत पांझरा नदीत वाहून जाते ते पाणी भाला नाल्यात उतरवुन पुढे लौकी नाल्यातुन शहापुर गावापर्यंत गेले तर शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल. आदी मागण्यां करण्यात आल्या,यावेळी नवनिर्वाचित सरपंच मनोहर पाटील सोबत पंचायत समिती चे माजी सभापती डाॅ. दिपक पाटील व ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर पाटील उपस्थित होते.यावर आमदार सो वाघ यांनी वरील प्रमाणे आश्वासन देऊन सर्वांचे समाधान केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *