मेहरगाव येथे १३ रोजी एकविरा देवीची प्राणप्रतिष्ठा, सलग तीन दिवस विविध कार्यक्रम…

अमळनेर येथून जवळच असलेल्या मेहरगाव येथे एकविरा देवीच्या प्राणप्रतिष्ठा निमित्ताने दिनांक १० शनिवार पासुन सलग तीन दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून दिनांक १३ मंगळवारी देवीची प्राणप्रतिष्ठा व भंडारा होणार असून नागरिकांनी उपस्थितीचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कालिका साधक महंत जगतदास महाराज व वेद मूर्ती बाळकृष्ण महाराज यांचा प्रेनेने गावाची कुलस्वामिनी एकविरा देवी मूर्तीची स्थसोना व प्राणप्रतिष्ठा जीर्णोद्धार आदी कर्कक्रम होणार आहेत काल सात कुमारिका पूजन व कलश पुजन मिरवणूकीसह जलधिनिवास आदी कार्यक्रम झालेत आज दिनांक ११ रोजी गणेश पूजन , पुण्यह वाचन, मातृका स्थापन, मूर्तिका स्थापन, धान्य निवास व देवीच्या मिरवणुकीसह पूजन होईल तर दिनांक १२ रोजी वास्तुहोम कुटीरहोम देवालय स्थापना व मूर्तीला शंकनिवास होईल तर दिनांक १३ रोजी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा ध्वजस्थापणा व घंटास्थापणा होऊन मेहरगाव ग्रामस्थांतर्फे भांडाऱ्याचे आयोजन केले आहे कार्यक्रमास भाविकांनी उपस्थितीचे आवाहन आयोजकांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *