खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

तालुक्यातील चिमनपुरी पिंपळे येथे कृषी संजिवनी सप्ताह कार्यक्रम अंतर्गत मार्गदर्शन

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील चिमनपुरी पिंपळे येथे कृषी संजिवनी सप्ताह कार्यक्रम अंतर्गत झालेल्या सभेत योजनांची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
यावेळी कृषी विभागाच्या योजना फळबाग, महाडीबीटी, पीएम कीसन केवायसी आदी विविध प्रकारची माहिती देण्यात आली. आंतरराष्ट्रीय तृणधान्य दिवसाच्या निमित्ताने बाजरी बियाणे मोफत शेतकऱ्यांना आधार कार्ड व उतारा घेऊन वाटप करण्यात आले.
तृणधान्य या पिकावर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पेरणी करावी पावसाळा 20 ते 25 दिवस उशिरामुळे शेतकऱ्यांनी तृणधान्य घ्यावे असे कृषी अधिकाऱ्यांचे म्हणणे पडले. त्यावेळी सरपंच, ग्राम सेवक, सदस्य व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकरी यांना कृषी सहाय्यक पुनम पाटील व समुह सहाय्यक दिनेश बोरसे यांनी मार्गदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button