अमळनेर: स्वतःच्या समाजाच्या देवाच्या मंदिरातील मूर्त्यांची तोडफोड करणाऱ्या शिरसाळे येथील एका माथेफिरूला मारवड पोलिसांनी अटक केली आहे.
शिरसाळे बु येथें ९ रोजी सकाळी बारा वाजेच्या सुमारास धनराज ओंकार महाले याने झाडी रस्त्यावरील कालबहिरम मंदिरातील देवांच्या मूर्त्यांचे तोडफोड सुरू केली याबाबत जागृत नागरिकांनी युवराज दगडू महाले यांना संगीतले असता त्यांनी धनराजला असे कृत्य करू नको म्हणून अटकाव करण्याचा प्रयत्न केला असता त्याने अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली यापूर्वी ही महिलांसमोर लज्जास्पद वर्तन केल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत युवराज महाले यांनी मारवड पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यावरून धनराज ओंकार महाले याच्या विरुद्ध विटंबना केली म्हणून कलम 295 प्रमाणे , असभ्य वर्तन आणि अश्लील शिवीगाळ केली म्हणून कलम २९४ , व शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली म्हणून कलम ५०६ प्रमाणे गुन्हा नोंदवून त्यास अटक करण्यात आली असून तपास पी एस आय निलेश शेमडे करीत आहेत.