पोलिसांच्या तत्परतेने आणि वन कर्मचाऱ्यांच्या धावपळीने जखमी हरणास मिळाले जीवदान

अमळनेर तालुक्यातील आर्डी शिवारातील जंगलात जखमी पडले होते हरण

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील आर्डी शिवारातील जंगलात जखमी हरणाचा जीव वाचविण्यात पोलिसांना आणि वन कर्मचार्‍यांना यश आले आहे.
अमळनेर तालुक्यातील आर्डी शिवारातील जंगलात एक हरीण जखमी अवस्थेत पडले असल्याने गावातील भूषण रामलाल वानखेडे या मुलाने अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक मिलिंद भामरे यांना फोन करून माहिती दिली. त्यांनी लागलीच पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांना सदर घटनेबाबत कळवुन लागलीच वनपाल प्रेमराज योगराज सोनवणे यांनाही फोन द्वारे जखमी हरणाच्या मदतीसाठी आर्डी गावी येण्याची विनंती केली. वनपाल सोनवणे व वनरक्षक रामदास वेलसे हे तातडीने आर्डी गावी पोहोचून जखमी हरणाचा जंगलात शोध घेऊन आधी प्रथमोपचार केले. नंतर एका खाजगी रिक्षाने अमळनेर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात आणले. त्यामुळे पशुवैद्यकीय डॉक्टरांकडून हरणावर वेळीच उपचार होऊन त्याचे प्राण वाचले.यामुळे पोलीस हवालदार मिलिंद भामरे, गणेश पाटील व वनपाल सोनवणे व वेलसे आदींचे सर्वांनी कौतुक केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *