खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

जुन्या पोलीस लाईनचे बांधकाम पाडायला सुरुवात, प्रशासकीय इमारतीचा मार्ग मोकळा

अमळनेर (प्रतिनिधी) आमदार अनिल पाटील यांनी केलेल्या आंदोलनाला यश आले आहे. यामुळे जुन्या पोलीस लाईनचे बांधकाम पाडायला सुरुवात झाली असल्याने प्रशासकीय इमारतीचा मार्ग मोकळा झाला आहे.लवकरच कामाचे भूमिपूजन होऊन कामाला सुरुवात होणार आहे.
आमदार अनिल पाटील यांनी महसुल आणि प्रशासकीय इमारत अशा दोन इमारती मंजूर केल्या होत्या. अमळनेर तालुक्याची उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार कार्यालय असलेली दुमजली महसूल इमारत आणि सर्व शासकीय कार्यालये एकाच मध्यवर्ती ठिकाणी असणारी प्रशासकीय इमारत जुन्या पोलीस वसाहतीच्या जागी मंजूर होऊन निधीही प्राप्त झाला होता. मात्र पोलीस प्रशासन जागा खाली करत नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाला काम सुरू करण्यास अडचणी येत होत्या. उच्च न्यायालय, आणि जिल्हाधिकारी यांच्या आदेशानन्तर देखील काम सुरू होत नसल्याने १२ जून रोजी आमदार अनिल पाटील यांनी तालुक्यातील जनतेसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले होते. आंदोलनाच्या प्रभावामुळे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी १५ दिवसात काम सुरू करतो, असे आश्वासन दिले होते तर पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी सात दिवसात जागेचा ताबा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्याचे आदेश दिले होते. मात्र सात दिवसाच्या आत कामाला गती मिळाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने पोलिसांची जुनी घरे पाडण्यास सुरू केले आहे. यामुळे लवकरच महसूल इमारतीच्या कामाला सुरुवात होणार असून तालुक्याच्या जनतेची सोय होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button