‘इडा पिडा टळो, बळीचं राज्य येवो’; बळीराजा ची मिरवणूक यंदाही मोठ्या दिमाखात संपन्न…

अमळनेर(प्रतिनिधी) ‘इडा पिडा टळो, बळीचं राज्य येवो’ या घोषणांच्या गजरात बलिप्रतिपदेला अमळनेर येथे बळीराजा लोकोत्सव समितीतर्फे आयोजित महात्मा बळीराजा ची भव्य मिरवणूक आजी माजी आमदारांच्या हस्ते बळीराजा पूजनाने संपन्न झाली.अमळनेर शहरात मागिल सलग १० वर्षांची सांस्कृतिक परंपरा असलेली बळीराजा ची मिरवणूक यंदाही मोठ्या दिमाखात निघाली. पानांफुलांनी व भगव्या झेंड्यानी सजलेल्या बैलगाड्यांवर ठेवलेले भव्य ‘ नांगर ‘ ,एका बैलगाडीवर बळीराजा ची भव्य प्रतिमा पुष्पहार टाकून उभी केलेली होती.मिरवणुकीत पारंपरिक पोषाखात अनेक मान्यवर कार्यकर्ते व महिलाही उत्साहात सहभागी झाल्या होत्या तर ‘काळ्या मातीत मातीत’,’आहे का कुण्या शेतकऱ्याचे स्विस बँकांमध्ये खात..”जेव्हा निघाली मैदानी’ अशी सवाद्य गीते सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
शिरूड नाका परिसरातुन छ.शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन व जिजाऊ वंदनेने बळीराजा मिरवणुकीस सुरवात झाली.

यावेळी जेष्ठ कार्यकर्ते व.ता.पाटिल,मनोहर पाटील,डी.डी.पाटील, प्रा.अशोक पवार, बळीराजा लोकोत्सव समितीचे रणजित शिंदे, नगरसेवक श्याम पाटील, दिलीप पाटिल,संदेश पाटिल, अनंत निकम, मा.नगरसेवक विनोद कदम,ऍड. तिलोत्तमा पाटिल व बळीराजा उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बळीराजाचे पूजन केले. अर्बन बँकेच्या व्हाईस चेअरमन सौ.वसुंधरा लांडगे यांनी जिजाऊ वंदना म्हटली, समितीचे कैलास पाटिल यांनी ‘बळीगीते’ गायलीत तर सूत्रसंचालन प्रा.लिलाधर पाटिल यांनी केले. बळीराजा मिरवणूक वडचौक, बालाजीपुरा,त्रिकोणी बाग मार्गे पाचपाऊली मंदिर परिसरातून धुळेरोड, बसस्टँड, विश्राम गृह ते बळीराजा स्मारक पर्यंत वाद्यवृंदासह आली.मिरवणुकीत संभाजी ब्रिगेड चे जयवंत शिसोदे,अनिल पाटिल ,अनिस चे जगदाळे, श्रीकांत चिखलोदकर, आर.बी.पाटिल, संजय पाटील,शिवा पाटिल आदि सहभागी झालेत.

आजी-माजी आमदार राजकिय पदाधिकारीतर्फे बळी राजापूजन-  

lबळीराजा स्मारक येथे मिरवणूक समारोप प्रसंगी मा.आ. कृषिभूषण साहेबराव पाटिल, जिल्हा बँक सदस्य अनिल पाटिल, अड.ललिता पाटिल यांच्या सह बळिराजा लोकोत्सव समितीचे पदाधिकारी यांनी पुष्पहार अर्पण करून पूजन केले.
आमदार शिरीष चौधरी यांनीही स्मारकावर आपल्या कार्यकर्त्यां सह व लोकोत्सव समितीच्या पदाधिकारी यांचेसह भेट देऊन बळीराजा चे पूजन केले. याप्रसंगी नगरसेवक प्रविण पाठक, सुनिल भामरे, मा.नगरसेवक अबू महाजन, बाळासाहेब संदनशिव, गुलाम नबी,अविनाश जाधव, धंनजय महाजन,विष्णू पाटिल, सुरेंद्र पाटिल,बंटी पाटिल आदि उपस्थित होते.
इडा पिडा टळो बळीचे राज्य येवो!अश्या घोषणा देत मिरवणुकी च्या समारोप प्रसंगी सयाजीराव पाटिल, विशाल पाटिल, रा.काँ तालुकाध्यक्ष सचिन पाटिल, विक्रांत बी.पाटिल, मुख्तार खाटिक, बाळू पाटिल, देविदास देसले,मंगरूळ येथिल हिम्मत पाटिल, पत्रकार चंद्रकांत काटे,जितेंद्र ठाकूर,मुन्ना शेख, जितेंद्र पाटील, जयेश काटे,सुंदरपट्टी चे सरपंच सुरेश पाटिल, उपसरपंच मधुकर पाटिल,रविंद्र ठाकूर, बँक संचालक शांताराम ठाकूर, सुनील शिंपी,राहुल गोत्राळ, सचिन बेहरे आदींसह मान्यवर मोठ्यासंख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
सलग दहा वर्षांपासून निघणाऱ्या बळीराजा लोकोत्सव समितीच्या मिरवणूकीच्या यशस्वीतेसाठी संजय पाटिल, शिवा पाटिल, विश्वासराव पाटील,अण्णा शेटे,उमेश चव्हाण, रवी अप्पा, दत्तू पाटील,गहिनीनाथ पाटील,प्रदिप पाटिल,जितेंद्र पाटिल, दिलीप कोळी,सुनिल मराठे,प्रकाश पाटिल, गणेश पाटिल,दादा मराठे,संजय पाटकरी,अमरनाथ मिस्तरी, प्रविण पाटिल, पिंटू वाल्हे,अमृत पाटिल,जय अंबे मित्र मंडळ,तरुण कुढापा मंडळ, माऊली ब्रास बँड आदिंसह विविध संघटनांचनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *