अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर येथिल बळीराजा लोकोत्सव समितीतर्फे बलिप्रतिपदे निमित्त महात्मा बळीराजा मिरवणूकीचे परंपरेनुसार आयोजन करण्यात आले आहे. मागिल १० वर्षांपासून सलग बळीराजा मिरवणूकीचे आयोजन अमळनेरच्या सांस्कृतिक परंपरेचा एक वैशिष्ट्य भाग झालेला आहे.
अमलनेरच्या शिरुडनाका परिसरातून सकाळी ९ वाजता सवाद्य मिरवणुकीस सुरवात होईल.वड चौक,झामीचौक परिसर,त्रिकोणी बाग परिसर ,पाचपाऊली देवी मंदिर परिसर ,बसस्टँड,धुळे रोड, विश्राम गृह मार्गे महात्मा बळीराजा स्मारक स्थळ येथे लोकजागर मिरवणूकीचा समारोप होईल.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या व लोकप्रतिनिधिंच्या हस्ते महात्मा बळीराजा यांच्या शिल्पप्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात येईल.
बळीराजा मिरवणुकीत मोठ्यासंख्येने सर्व नागरीकांनी, आजी माजी लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना,कार्यकर्ते पदाधिकारी,सेवाभावी व्यक्तींनी सहभागी व्हावे असे आवाहन महात्मा बळीराजा लोकोत्सव समितीतर्फे जेष्ठ कार्यकर्ते मनोहर पाटिल, रणजित शिंदे, संदेश पाटील,कैलास पाटील,प्रा.लिलाधर पाटिल, नगरसेवक श्याम पाटिल, जयअंबे मित्र मंडळाचे दिलीप पाटील,मराठा सेवा संघ चे जयवंत शिसोदे, संभाजी ब्रिगेड चे अनंत निकम,तरुण कुढापा मंडळ जितेंद्र पाटिल आदिंनी केले आहे.