अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर येथे जळोद रोडवर नंदगांव कडेस जाणाऱ्या आयशर गाडीत अवैधरित्या
३० ड्रम अंदाजे ६००० लिटर स्पिरीट आढळून आले असून एकूण अडीच लाख रु किंमतीचे स्पिरिटसह गाडी जप्त करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे की अमळनेर येथे काल सायंकाळी पोलीस कर्मचारी भटूसिंह तोमर व प्रदिप पवार हे कर्मचारी पोलीस स्टेशनला हजर असतांना त्यांना माहिती मिळाली कि, पोलीस स्टेशनचे चालक हे कॉ ज्ञानेश्वर पुंडलिक सपकाळे यांनी वाहन नं. MH१८/BG८१७२ संशयित आयशर वाहन अडविली असून त्यामध्ये काहीतरी संशयास्पद वस्तू आहेत व ते वाहन जळोद रोडवर नंदगांव ता. अमळनेर कडेस जाणाऱ्या रोडवर काही अंतरावर उभी आहे अशी माहिती मिळालेल्या माहितीवरून घटनास्थळी गेले असता तेथे विशाल बाळू पाटील वय २४ वर्षे रा.वाहुटे ता.पारोळा ह.मु.अभय कॉलेज रोड शांतीनगर प्लॉट नंबर ४८ कॉटन मार्केट मागे धुळे,वाहन मालक राकेश निंबा पाटील रा.प्लॉट नं ७० संभाप्पा कॉलनी चितोड रोड धुळे, यांच्या वाहनात मिळून आलेले स्पिरीट हे सिल्लोड येथून घेतले असून मालेगांव जि. वाशीम येथे राहणारे बाबा देशमुख यांना पोहच करण्यासाठी जात असल्याचे सांगितले.सदर यांच्या वाहनात २०० लिटर मापाचे ३० प्लॉस्टीकचे ड्रम त्यात निळ्या रंगाचे १९, पिवळ्या रंगाचे ९, हिरव्या रंगाचे २ ड्रम दिसून आले. त्यामध्ये स्पिरीटने भरलेले एकूण ३० ड्रम किंमत एकूण २,५२,०००/- असे जप्त केले.तसेच आयशर कंपनीचे मॉडेल ३०१५. क्रमांक MH १८-BG,८१७२ अंदाजे १०,००,०००/- रुपये किंमतीचे वाहन जप्ती पंचनाम्यात जप्त केले आहे. या तिघाविरुध्द मुंबई प्रोव्हि. कायदा कलम ६७६७ (१) (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावेळी स.पो.नि.सदगिर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून पुढील तपास पोलिस करीत आहे.