खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
सामान्यज्ञान

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

🎯#tcs_ibps_pattern

⭕️ भूगोलाच्या tcs ने विचारलेल्या आगळ्यावेगळ्या concept…

♦️भारतातील वेगवेगळ्या नद्यांची जुनी किंवा इतर दुसरी नावे….

👉 तुंगभद्रा नदी – पंपा नदी

👉 रावी नदी – पारुष्णी नदी

👉 नर्मदा नदी – रेवा नदी

👉तापी नदी – नर्मदेची दासी

👉गंगा नदी – पद्मा नदी (बांगलादेशातील प्रवाह)

👉 गंडक नदी – नारायणी नदी

👉 लुनी नदी – लानारी नदी, लावणवती

👉 घाग्रा नदी – कर्नाली नदी

👉 सुरमा नदी – बराक नदी

👉ब्रम्हपुत्रा नदी – त्संगापो ( तिबेट)
दिहांग (अरुणाचल प्रदेश)
जमुना (बांगलादेश )

🪀 *सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*

*16 जून चालू घडामोडी*
#ChaluGhadamodi #MPSCNews

Q. महाराष्ट्र सरकारच्या मंत्री मंडळाने ने राज्यात कोठे ४ अतिरिक्त कौटुंबिक न्यायालय स्थापन करण्यास मान्यता दिली आहे?
*Ans- पुणे*

Q. महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्यात सध्या किती कौटुंबिक न्यायालय कार्यरत आहेत?
*Ans- ५*

Q. कोणत्या कंपनीचा शेअर भारतातील पहिला १ लाखाच्या वर किमतीचा शेअर ठरला आहे?
*Ans- MRF*

Q. महाराष्ट्र सरकारने कोणत्या जिल्यात पशुरोग निदान प्रयोगशाळा स्थापन करण्यास मान्यता दिली आहे?
*Ans- लातूर*

Q. केंद्र सरकार भूस्खलन रोखण्यासाठी किती राज्य आणि केंद्र शासित प्रदेशात राष्ट्रीय भूस्खलन जोखीम प्रतिबंधक प्रकल्प सुरु करणार आहे?
*Ans- १७*

Q. महाराष्ट्र राज्यातील कोणत्या शहराच्या वाहतूक पोलिसांकडून १४ जून हा दिवस नो हॉन्किंग डे राबविण्यात येणार आहे?
*Ans- मुंबई*

Q. हॅनले प्रायव्हेट वेल्थ मायग्रेशन च्या अहवाला नुसार मागच्या वर्षी भारतातून किती अतिश्रीमंत व्यक्ती परदेशात गेले आहेत?
*Ans- ७५००*

✅ *DAILY UPDATE*

👇👇👇👇👇

🪀 *सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*

*📣ऐतिहासिक घडामोडी | 🌞दिनविशेष | 16-जून -2023 | महत्वाच्या घटना | जन्म /मृत्यू*
—————————————————

भारताच्या फाळणीची योजना स्वीकारली, भारत आणि पाकिस्तान असे दोन देश निर्माण; आज इतिहासात वाचा सविस्तर

*🌏जागतिक दिवस:*
जागतिक ज्येष्ठ नागरिक छळ जागृती दिवस
जागतिक वारा दिन:

*🗞️महत्वाच्या घटना*

*▪️१६६७:* वैद्यकीय इतिहासात प्रथमच जॉं बाप्तिस्ते डेनिस या डॉक्टरने १५ वर्षे वयाच्या एका फ्रेंच मुलाच्या शरीरात कोकराचे रक्त टोचले.
*▪️१८४४:* चार्ल्स गुडइयरने रबराच्या व्हल्कनायझेशनचे पेटंट घेतले.
*▪️१८६९:* महाराष्ट्रातील पहिला विधवा विवाह साजरा झाला.
*▪️१९१९:* कॅप्टन जॉन अलकॉक, लेफ्टनंट आर्थर ब्राऊन यांनी विमानातून सर्वप्रथम अटलांटिक महासागर पार केला.
*▪️१९७०:* बा. पां. आपटे पुणे विद्यापीठाचे आठवे कुलगुरू झाले.
*▪️१९९३:* संपूर्ण देशी बनावटीच्या सहा ‘अर्जुन’ रणगाड्यांची पहिली तुकडी लष्कराकडे सुपूर्द करण्यात आली.
*▪️१९९४:* इस्त्रायल व व्हॅटिकन सिटी यांमधे पूर्ण राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.
*▪️१९९७:* अजामीनपात्र गुन्ह्याचा आरोप असलेली व्यक्ती फरारी असेल, तर तिच्यावर आरोपपत्र दाखल नसतानाही न्यायमूर्ती अटक वॉरंट जारी करू शकतात असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला.
*▪️२००१:* ग्रँडमास्टर विजयालक्ष्मी सुब्रह्मण्यम यांनी राष्ट्रीय अ बुद्धिबळ स्पर्धा विक्रमी पाचव्यांदा जिंकली.
*▪️२००८:* लेहमन ब्रदर्स या वित्तसंस्थेने दिवाळखोरी जाहीर केली.


*🤵‍♂जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:*

*▪️१८७८:* भारतीय-अमेरिकन गोल्फर मार्गारेट अॅबॉट यांचा जन्म. (मृत्यू: १० जून १९५५)
*▪️१८९८:* पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक गजानन श्रीपत तथा अण्णासाहेब खेर यांचा जन्म. (मृत्यू: २९ ऑगस्ट १९८६)
*▪️१९०७:* स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील नेते आणि समाजवादी विचारवंत ना. ग. गोरे यांचा जन्म. (मृत्यू: १ मे १९९३)
*▪️१९१७:* संगीतकार मेंडोलीनवादक सज्जाद हुसेन यांचा जन्म. (मृत्यू: २१ जुलै १९९५ – माहीम, मुंबई)
*▪️१९२३:* साहित्यिक केशवजगन्नाथ पुरोहित ऊर्फ शांताराम यांचा जन्म.
*▪️१९२७:* भारतीय-पाकिस्तानी कवी आणि लेखक इब्न-ए-इनशा यांचा जन्म. (मृत्यू: ११ जानेवारी १९७८)
*▪️१९२८:* साहित्यिक शंकर वैद्य यांचा जन्म.
*▪️१९२९:* गायिका व अभिनेत्री सुरैय्या जमाल शेख ऊर्फ सुरैय्या यांचा जन्म. (मृत्यू: ३१ जानेवारी २००४)
*▪️१९३२:* धृपद गायक झिया फरिदुद्दीन डागर यांचा जन्म. (मृत्यू: ८ मे २०१३)
*▪️१९३३:* लेखिका सरोजिनी वैद्य यांचा जन्म. (मृत्यू: ३ ऑगस्ट २००७)
*▪️१९३७:* लोकपाल बिलासाठी आग्रह धरणारे समाजसेवक अण्णा हजारे यांचा जन्म.
*▪️१९४७:* साहित्यिक आणि नाटककार प्रेमानंद गज्वी यांचा जन्म.

*👲मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:*

*▪️१५३४:* योगी चैतन्य महाप्रभू यांचे निधन. (जन्म: १८ फेब्रुवारी १४८६)
*▪️१९३१:* अर्वाचीन मराठीतील सुलभ लेखन शैलीचे प्रवर्तक, संदेशकार अच्युत बळवंत कोल्हटकर यांचे निधन.
*▪️१९७९:* कवी गीतकार सूर्यकांत रामचंद्र खांडेकर यांचे निधन. (जन्म: २ एप्रिल १९२६)
*▪️१९८३:* साहित्य अकादमी पुरस्कार विजेते तेलुगू कवी गीतकार श्रीरंगम श्रीनिवास राव ऊर्फ श्री श्री यांचे निधन. (जन्म: ३० एप्रिल १९१०)

🪀 *सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*

🌐 *भारताच्या ललिता नटराजन यांना ‘ द इकबाल मसिहा अवार्ड 2023* ‘

🎯 *वॉशिंग्टन* – *अमेरिकेच्या* कामगार विभागाने आज जाहीर केले की, भारतातील बालमजुरी आणि आधुनिक गुलामगिरी विरुद्ध लढा देणाऱ्या ललिता नटराजन या कार्यकर्त्या आहेत. *बालमजुरी निर्मूलनासाठी 2023 चा इक्बाल मसिह पुरस्कार प्राप्तकर्ता.*

🎯 भारतातील *चेन्नई येथील यूएस कॉन्सुलेट जनरल* येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

🎯 “समाजातील सर्वात असुरक्षित लोकांचे रक्षण करण्याचे ललिता नटराजन यांचे प्रचंड धाडस हे आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे,” असे आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या उप उपसचिव थे ली म्हणाल्या. “छळ आणि धमक्यांचा सामना करत, तिने मुलांच्या हक्कांसाठी वकिली करणे आणि गुन्हेगारांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा देणे सुरूच ठेवले आहे. कारणाप्रती तिच्या निर्भीड बांधिलकीमुळे, बालमजुरीच्या निर्मूलनासाठी तिला 2023 चा इक्बाल मसिह पुरस्कार मिळाला आहे.”

🪀 *सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button