दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर अमळनेर नगरपरिषदने नाशिक विभागात प्रथमच १८ घंटा गाडी खरेदी…

स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी ५.०५ कोटी रुपये.अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर- स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी ५.०५ कोटी रुपये मंजूर झाले होते त्यात अमळनेर नगरपरिषदने नाशिक विभागात प्रथमच आज दि ६ रोजी १८ घंटा गाडी खरेदी केल्या आहेत यासाठी महाराष्ट्र व केंद्र शासन २.९५ कोटी रुपये व अमळनेर नगरपरिषद २.१० कोटी असे एकूण ५.०५ कोटी रुपये प्रकल्पसाठी मंजूर झाले आहेत.अमळनेर शहरात एकूण १७ प्रभाग आहेत त्या १७ प्रभागासाठी व मुख्य बाजार पेठ साठी १ गाडी असे एकूण १८ गाडया नगर परिषदेने खरेदी आज दि ६ रोजी केल्या आहेत त्यासाठी सुमारे १ कोटी रुपये मंजूर होते. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्थापत्य कामांसाठी २ कोटी रुपये व ओला सुका कचरा वर्गीकरणासह खत निर्मितीसाठी लागणाऱ्या मशनरी खरेदी साठी २ कोटी रुपये मंजूर झाली आहेत व त्याचे काम सुरु असल्याचे नगराध्यक्षा पुष्पलता साहेबराव पाटील यांनी सांगितले घन कचरा व्यवस्थापन साठी अमळनेर नगरपरिषदेने सुमारे २ कोटी रूपयांची गुंतवणूक केली आहे.घंटा गाडयाचे पूजन करतांना माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, उपनगराध्यक्ष विनोद लांबोळे, रामभाऊ संदानशिव, बांधकाम सभापती मनोज पाटील, विक्रांत पाटील,शेखा हाजी , संतोष लोहेरे, दिपक पाटील, अभियंता संजय पाटील, प्रशासन अधिकारी संजय चौधरी, आरोग्य  निरीक्षक युवराज चव्हाण, संतोष बिरहाडे, अरविंद कदम,राधेश्याम अग्रवाल, अनिल शिसोदे, निशांत अग्रवाल, विवेक पाटील, अड. यदनेश्वर पाटील, राजेंद्र यादव आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *