खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलचा स्थापना दिन विविध कार्यक्रमांनी साजरा

अमळनेर (प्रतिनिधी) येथील ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलचा १० वा स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांना स्वीट्स व गुलाबपुष्प देऊन करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. ललिता पाटील होत्या प्रमुख पाहुणे म्हणून संचालक पराग पाटील, देवश्री पाटील, प्राचार्य विकास चौधरी आदी उपस्थित होते. कार्यक्रमात अश्विनी चौधरी व देवयानी पाटील यांनी गणेश वंदना नृत्य स्वरूपात सादर केली. मागील वर्षातील १०वी व १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व मेडल देऊन गुणगौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांपैकी प्रगती गोसावी, दर्शन पाटील, संजीवनी पाटील व महेश पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच शाळेच्या स्थापनेपासुन कार्यरत असलेल्या शिक्षिका मंगला चौधरी व सुरेखा सोनगडकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम प्रसंगी सिनियर विद्यार्थ्यांनी ‘ड्रामा विथ डान्स’ सादर केला. ॲड. ललिता पाटील यांनी शाळेच्या प्रगतीसाठी झालेल्या संघर्षाची जाणीव करून देत धर्याने पुढे जाण्याची ताकद सर्वाना आपल्या मनोगतात स्पष्ट करून दिली. त्याचबरोबर शाळेच्या प्राचार्यांनी शाळेविषयी मार्गदर्शन केले. विलास पाटील यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button