अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर शहरातील एका शिक्षकाचे ए.टी.एम.चा वापर करून त्याचे तीन बँकेतील ७० हजार लंपास करून फसवणूक करण्यात आली.
महेंद्र पाटील रा अमळनेर हे २९ रोजी दुपारी सव्वा दोन वाजता अमळनेर बसस्थानकावर लघुशंकेला गेले असता त्यांच्या मागच्या खिश्यातील एच.डी.एफ.सी., एक्सिस बँक,व स्टेट बँक चे ए.टी.एम.कार्ड ठेवलेले होते सदरचे ते पाकीट गहाळ झाले दुपारी २ वाजून ४२ मिनिटांनी त्यांच्या एच.डी.एफ.सी. बँकेचे २० हजार ₹ काढण्यात आल्याचा संदेश त्यांच्या भ्रमणध्वनीवर आला, लगेच २ वाजून ४६ मिनिटांनी एक्सिस बँकेच्या खात्यातून १० हजार ₹ व २ वाजून ५६ मिनिटांनी स्टेट बँकेच्या खात्यातून ४० हजार ₹ लंपास केले एकूण ७० हजार रुपये एकाच वेळी बसस्थानक जवळील आय. डी. बी. आय बँकेच्या ए.टी.एम. मशीन मधून काढण्यात आल्याचे उघडकीस आले महेंद्र पाटील यांनी ५ रोजी फिर्याद दिल्यावरून भा द वि कलम ४२० प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पुढील ए.एस.आय.प्रभाकर पाटील करीत आहेत