अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथे ५ रोजी नँशनल इंटीग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) शाखा अमळनेरतर्फे धन्वंतरी जयंती डॉ.अतुल चौधरी यांच्या अथर्व आर्युवेद क्लिनिक येथे साजरी करण्यात आली. धन्वंतरी पुजन करून धन्वंतरी स्तवन म्हणण्यात आले. त्यानंतर पिंपळे रोडवरील झोपडपट्टीतील प्रत्येक गोरगरीब कुटूंबाला निमाच्या सदस्यांनी दिवाळीनिमित्त फराळ वाटप करण्यात आले. यावेळी फराळवाटपाप्रसंगी निमाचे अध्यक्ष डॉ.रविंद्र जैन, कोषाध्यक्ष डॉ.सचिन पाटील,डॉ.रमेश अहिरराव,डॉ. मिलिंद वैद्य ,डॉ.महेश पाटील,डॉ.निलेश जैन, डॉ. विशाल बडगुजर,डॉ.उमेश सोनवणे,डॉ.अतुल चौधरी,डॉ.लीना चौधरी,डॉ.हेमंत कदम,डॉ.दिनेश गोकूळ पाटील,डॉ.गौरव मुठ्ठे,बालरोगतज्ञ डॉ.कमलेश पाटील उपस्थित होते.