अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने केला बलात्कार…

अमळनेर: जवखेडा येथील अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून शिरुड येथील तरुणाने बलात्कार केला व नातेवाईकांनी सहकार्य केले म्हणून शिरूडच्या ५ व जवखेड्याच्या दोन जणांवर पोस्को कायद्यानुसार बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जवखेडा येथील अल्पवयीन मुलीला शिरुड येथील नरेंद्र मच्छीन्द्र सोनवणे,मीराबाई मच्छीन्द्र सोनवणे,गोविंदा मच्छीन्द्र सोनवणे,पद्मिनी भिल,आबा भिल व जवखेडा येथील ज्योतिबाई शरद मालचे,शरद लहू मालचे यांनी नरेंद्र सोबत लग्न लावण्याचे आमिष दाखवून तिला २० एप्रिल रोजी शिरुड येथे नेले व २० ते २४ दरम्यान नरेंद्र ने तिच्याशी शारीरिक संबध केले तिने नकार दिला असता मी तुझ्याशी लग्न करणार नाही असे सांगून धमकी दिली त्याला त्याच्या सहाही नातेवाईकांनी सहकार्य केले. अखेरीस अल्पवयीन मुलीने अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून भादवी ३७६, ५०६ व बालकांचा लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ४,८,१२, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *