अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर येथील आर के नगरात राहणाऱ्या तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दुपारी २ वाजेच्या सुमारास काल घडली असून याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आर के नगर भागातील रहिवासी अश्विन दिलीप पाटील याने दिलेल्या खबरीवरून नोंद करण्यात आली आहे. हेमंत हरलाल शिंपी या ३६ वर्षीय तरुणाने राहत्या घरी स्लॅबच्या लोखंडी कडील रुमालाच्या साहाय्याने टांगून गळफास घेतला आहे त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले होते त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.त्या नंतर शवविच्छेदन करण्यात आले.