खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

स्वच्छ भारत अभियानांतर्गत मंगळग्रह मंदिरावर भाविकांचे सलग तेरा तास श्रमदान

जय बाबाजी ग्रुपने देशात ५०० ठिकाणी सेवा देऊन राबवला अभिनव उपक्रम

अमळनेर (प्रतिनिधी) स्वच्छ भारत अभियानांतर्गत शिवराज्याभिषेक व जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ४ जून रोजी जय बाबाजी ग्रुपच्या सदस्यांनी श्री मंगळग्रह मंदिर येथे पहाटे पाच ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत श्रमदान करून अनोखा उपक्रम राबविला. जय बाबाजी ग्रुपने देशात ५०० ठिकाणी सेवा देऊन हा अभिनव उपक्रम राबवला आहे.
जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज, तसेच महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली १० लाख तासांचा स्वच्छतारूपी महाश्रमदानाचा उपक्रम संपूर्ण देशात राबविला जात आहे. भारतातील ऐतिहासिक व धार्मिक अशा ५०० स्थळांवर एक लाख भाविकांच्या सहभागाने हे श्रमदान झाले आहे. नागडे.ता.येवला.जिल्हा नाशिक येथील जय बाबाजी ग्रुपच्या १३५ जणांचा या उपक्रमात सहभाग होता. बाळू शिंदे, एकनाथ सातारकर,रमेश सोमासे, ज्ञानेश्वर भावसार यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रुपच्या सदस्यांनी श्रमदान केले. तत्पूर्वी मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले ,सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी,विश्वस्त अनिल अहिरराव यांनी जय बाबाजी ग्रुपच्या सदस्यांचे स्वागत केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button