अमळनेर(प्रतिनिधी) येथिल कु.शैलजित रणजित शिंदे या मुलीने आपला जन्मदिवस रस्त्यावरील गरीब गरजू महिलांना साड्या देत व दिवाळीचा फराळ वाटून आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला.
कन्याजन्माचे स्वागत व गौरव म्हणून सालाबादप्रमाणे शिंदे कुटुंबीय मुलीचा जन्मदिवस जल्लोषात व मोठ्याप्रमाणात जेवणावळीने साजरा करतात. यंदा मात्र कु.शैलजित शिंदे ने नेहमीच्या जेवणावळी व जल्लोषपूर्ण वाढदिवसाच्या मोठ्या संभारंभाला फाटा दिला. शहरातील रस्त्यांवरील, स्टेशनपरिसर व मंदिर परिसरातील गरीब गरजू अनाथ महिलांना दिवाळीच्या निमित्ताने स्व:हस्ते साड्या दिल्यात.तर गरीब गरजू माणसं व मुलांना दिवाळी फराळाचे वाटप करून आपल्या जन्मदिवसाच्या आनंदात रस्त्यावरील गरीब कुटुंबानाही सामावून घेतले.यावेळी सोबत कु.शैलजित चे वडिल सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे व आई सौ.शैलजा शिंदे हि ठिकठिकाणी साड्या व फराळ वाटपप्रसंगी सोबत उपस्थित होते.