दोधवद व हिंगोणे खुर्द गावाला चोरट्याचा धुमाकूळ मंदिरांसह चार घरे फोडली

शेतमजुरांचे सोने चांदीसह सुमारे एक लाख रुपये लांबवले

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील दोधवद व हिंगोणे खुर्द गावाला मंदिरांसह चार घरे फोडून शेतमजुरांचे सोने चांदीसह सुमारे एक लाख रुपये अज्ञात चोरट्यानी चोरून नेल्याची घटना १ रोजी रात्री घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशीं की, दोधवद येथील गावाच्या बाहेरच्या बाजूला असलेल्या भरत झगा भोई हे बाहेर झोपलेले असताना चोरट्यानी मागच्या बाजूने घरात प्रवेश करून ४० भार चांदी ,२ ग्राम सोने व रोख दोन हजार रुपये तर जवळच असलेल्या हिंगोणे खुर्द गावात पांडुरंग हिम्मत कोळी या मजुराच्या घरात मागच्या बाजूने शेतातून प्रवेश करून २० हजार रुपये तर उखा सखाराम कोळी यांच्या पत्नीने काढलेल्या बचत गटाचे कर्जाची रक्कम ११ हजार रुपये रात्री घरात घुसून काढून घेतले. त्याच प्रमाणे म्हाळसादेवी व दमोता माता मंदिरातील दानपेटी काढून त्यातील सुमारे २० हजार रुपये चोरून नेले आणि दानपेटी गावाबाहेर फेळून दिली. उन्हाळ्यात ग्रामीण भागात लोक बाहेर झोपलेले असतात आणि गरीब मजूर घराला कुलूप देखील लावत नाहीत त्याचा गैरफायदा चोरत्यानी घेतला. घटनेचे वृत्त मारवड पोलीस स्टेशनचे फिरोज बागवान आणि हेडकॉन्स्टेबल मुकेश साळुंखे याना कळवण्यात आले आहे. हेडकॉन्स्टेबल संजय पाटील पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *