लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले, कारवाईचे जोरदारपणे स्वागत
अमळनेर(प्रतिनिधी) पैशांसाठी चटवलेल्या येथील एका महाविद्यालयाच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या केंद्रावरील बहीस्थ परीक्षकाला 5 हजारांची लाच घेताना नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले, परीक्षा केंद्राच्या आवारातच दुपारी ही कारवाई करण्यात आल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली. अवघ्या दोनच दिवसांत त्याच्या नांग्या ठेचल्या गेल्याने विद्यार्थांनी या कारवाईचे जोरदार स्वागत करण्यात आले.
अमळनेर येथील एका महाविद्यालयाच्या केंद्रावर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरू आहेत. परीक्षा सुरू होऊन दोनच दिवस झाले होते. यात विद्यापीठाने विजय गुलाबराव पाटील यांची बहिस्थ परीक्षक म्हणून नेमणूक केलेली होती. मात्र त्यांनी परिक्षार्थी विद्यार्थ्यांना त्रास देणे सुरू केले.
निर्लज्य पणाचा गाठला होता कळस
बहीस्थ परीक्षक विजय गुलाबराव पाटील याने परीक्षा काळात परीक्षार्थींना विनाकारण त्रास देणे, कॉपी चालू देण्यासाठी त्यांच्याकडून पैश्यांची मागणी करणे असे प्रकार चालू केले होते. यातच तक्रारदार यांच्या पत्नीचे व इतर ८ विद्यार्थ्यांचे बॅचलर ऑफ लायब्ररी (बी.लिब) चे पेपर सूरु होते. यावेळीं त्यांनी परीक्षा देणाऱ्या महिला आणि मुलींची ओढनी तपासणी करित निर्लज्य पणाचा कळस गाठला होता.
कॉपीसाठी असे ठरवले होते दर
विजय पाटील यांनी परीक्षक म्हणून पेपर सुरळीत चालू ठेवण्यासाठी तसेच कॉपीला सहकार्य करण्यासाठी ८ विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयासाठी १०० असे ९ विषयांसाठी एकूण ९०० रुपयांची अशी एकूण ७२०० रुपयांची मागणी त्यांनी विद्यार्थ्यांकडे केली.
असा अडकला जाळ्यात
विजय पाटील यांचा कहर अधिक वाढला होता.,” जून रोजी पेपर सुरू झाल्यावर तक्रारदार विजय पाटील यांना तडजोड अंती ठरलेल्या रकमेपैकी ५००० रुपये महाविद्यालयाच्या आवारात देत असतांनाच नाशिक ला.प्र.वि.नाशिक चे पोलीस उप अधीक्षक अनिल बडगुजर,पथकातील राजेंद्र गीते,संदीप बत्तीसे, संजय ठाकरे,संतोष गांगुर्डे यांनी पाटील यांना रंगेहाथ पकडले. अमळनेर पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. ट्रॅप झाल्यानंतर त्याने खिशातील पैसे काढुन फेकून दिले. उसनवारी पैसेही दिल्याचा आव आणला होता. पण पथकाने त्याची चांगलीच जिरवली..!
विजय पाटील याची मूजोरीची भाषा
विजय पाटील याला बहीस्थ परीक्षक म्हणून नियुक्ती मिळाल्याने त्याच्या डोक्यात हवा गेली होती. मी कुणालाच घाबरत नाही. जळगाव जिल्ह्यामध्ये माझा रेकॉर्ड आहे. कोणाला काही वाकडे करायचे ते बिनधास्त करा, अशी मुजोरी भाषा वापरायचा. त्यामुळे त्याच्या असंख्य तक्रारी वाढल्या होत्या.
नियुक्तीच संशयाच्या भोवऱ्यात
मुक्त विद्यापीठात कोण प्रवेश घेतो, ज्यांना नियमीत शिक्षण घेता येत नाहीत, असें नागरिक व महिला, मुली शिक्षण घेतात. मग असा वादग्रस्त व्यक्तीची नियुक्ती कोणी केली, काय पाहुन त्याची नियुक्ती केली. आदी प्रश्न उपस्थित केले जात आहे. त्यामुळे विद्यापीठ त्याची नियुक्ती करणाऱ्याची चौकशी करेल का, विदयार्थ्यांना न्याय मिळेल का याकडे लक्ष लागले आहे.
खबरीलालची भूमिका
खबरीलालने हा प्रकार स्वतः डोळ्यांनी पाहिला गयावया करणारे मुले, मुली मेटाकुटीला आले होते.पण विजय पाटील लुटायला आला होता. त्यामुळे त्याला धडा शिकवला. खबरीलालची भूमिका कोणाला त्रास देणारी नाही, पण सर्वसामान्य लोकांवर अन्याय झाल्यास त्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, मुळात कुठल्याही पत्रकाराला कोणीही कमी लेखू नये.