अमळनेर (प्रतिनिधी) किसान क्रेडीट कार्ड ए.टी.एम. हे नजरचुकीने गहाळ झाल्याने त्यावर पिन असल्यामुळे ५१,७०० रुपये विड्रॉल केल्याने फसवणूक झाली.
याबाबत अधिक माहिती अशी की, सविता प्रल्हाद पाटील (रा. साईबाबाबा मंदीराजवळ, पैलाड, अमळनेर) ह त्यांचे पतीसह अमळनेर तहसील कार्यालय अमळनेर येथे कामामिनित्ताने आलेल्या असतांना त्यांचे जे.डी.सी.सी. बँक शाखा-जानवे ता. अमळनेर येथील किसान क्रेडीट कार्ड ए.टी.एम. हे नजरचुकीने गहाळ झाले होते. सदर कार्डच्या कागदी पाकीटावर फिर्यादी यांनी त्याचा पिनकोड लिहुन ठेवलेला होतो. कार्डचा वापर करुन पैसे काढणे असल्याने त्यांनी कार्डचा घरात शोध घेतला असता ते मिळुन आले नव्हते. म्हणुन त्यांचे पती यांनी तात्काळ जे.डी.सी.सी. बँक शाखा- जानवे ता. अमळनेर येथील शाखा व्यवस्थापक यांना कार्ड बंद करणेबाबत विनंती केली असता त्यावेळी शाखा व्यवस्थापक यांनी त्यांना कार्डचा वापर करुन दि. २६/०५/२०२३ ते दि.२९/०५/२०२३ रोजी पावेतो एकुण ५१,७००/- रुपये विड्रॉल करण्यात आले असल्याचे कळविले. त्यावरुन सविता प्रल्हाद पाटील यांनी फिर्याद दिल्यावरुन अमळनेर पोलीस स्टेशन गु.र.नं.२०२/२०२३ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सीसीटीव्ही वरुण घेतला संशयितांचा शोध
अमळनेर पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय शिंदे यांनी सदर घटनेची तात्काळ दखल घेत नमुद ए.टी.एम. चा वापर करून ज्या ए.टी.एम मशीन मधुन पैसे काढण्यात आले तेथील संपुर्ण सी.सी.टि.व्ही फुटेज प्राप्त करुन फुटेजचे योग्य ते अवलोकन करुन आरोपीताचा शोध घेण्याच्या सुचना पोना दिपक माळी, पोना रविंद्र पाटील अश्यांना दिल्या त्यानुसार पोना दिपक माळी, पोना रविंद्र पाटील अश्यांनी सी.सी. टि. व्ही फुटेज प्राप्त करुन त्यांचे गोपनिय बातमीदार, हद्दीतील पोलीस पाटील, गावोगावी फिरुन सदरचे सी.सी.टि.व्ही. फुटेज दाखवुन आरोपीताचा कसोशिने शोध घेत होते.
अशी केली आरोपीस अटक
त्यांनतर वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाने पोना दिपक माळी, पोना रविंद्र पाटील वरील गुन्ह्यांतील आरोपीताचा शोध घेत असतांना त्यांना गुप्त बातमी मिळाली की, इसम नामे प्रकाश कृष्णा पाटील (रा. दरेगांव ता. अमळनेर) यांने नमुद ए.टी.एम. कार्डचा वापर करुन आय.सी.आय. सी. बँक ए.टी.एम.मधुन पैसे काढले असल्याची खात्रीशिर बातमी मिळाली. त्यावरुन वरील पोलीस पथकाने प्रकाश कृष्णा पाटील यांस दरेगांव (ता. अमळनेर) येथील त्याचे शेतातुन ताब्यात घेवुन पोलीस स्टेशनला आणले व त्यास विश्वासात घेवुन विचारपुस करता त्यानेच आय. सी. आय. सी. बँक ए.टी.एम.मधुन फिर्यादी यांचे जे.डी.सी.सी. बँक शाखा- जानवे ता. अमळनेर येथील किसान क्रेडीट कार्ड ए.टी.एम. चा वापर करुन वेळोवेळी ५१७००- रु. फिर्यादी यांचे संमतीवाचून लबाडीच्या इराद्याने काढली असल्याची कबुली दिली त्यास अटक करण्यात आली आहे. पुढील तपास अमळनेर पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय शिंदे यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे पोहेकॉ सुनिल हटकर, पोहेकाँ किशोर पाटील, पोना दिपक माळी, पोना शरद पाटील, पोना रविंद्र पाटील, पोना सिध्दांत सिसोदे असे करत आहेत.