अमळनेर (प्रतिनिधी ) मोबाईल आणि सोशल मीडियाच्या दुनियेत पारंपारिक रूढी परंपरा संस्कार आदींना तिलांजली दिली जात आहे, समाज व्यसनाच्या आहारी जात आहे, संस्कार आणि संस्कृती टिकवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, यासाठी श्रीगुरु वैकुंठवासी मोठेबाबा स्मृती मंदिर अमळनेर या ठिकाणी बाल सुसंस्कार आणि धर्मप्रचार शिबिर झाले.
गावोगावी अशी संस्काराची शिबिर व्हावीत असा मोठे बाबांचा मानस होता, आणि तो पूर्ण होताना आज पाहता येत आहे, या शिबिरात बालकासह अबालबुद्ध सहभागी झाले होते, पंधरा दिवस शिबिर झाले असून गावोगावी अशा शिबिराची आवश्यकता असल्याचा सूर उमटत आहे, शिबिरात आध्यात्मिक वारकरी संप्रदाय पद्धतीने धर्म जागरण हेतूने रोज सकाळी काकड आरती व्यायाम योगासन दिवसभर अनेक ग्रंथांचे शिक्षण भारतीय संस्कृतीचे अलौकिक ज्ञान व सायंकाळी हरिपाठ आणि रात्री महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तने संपन्न झालीत, शिबिराला श्रीगुरु वै मोठेबाबा स्मृती मंदिर ट्रस्ट मंडळाच मोलाच सहकार्य लाभलं. त्यामध्ये मंदिराचे अध्यक्ष शांताराम पाटील असतील. शिंदे नाना, सी. एस. पाटील, वाय ये बोरसे, जी. बी. पाटील व इतर सर्व ट्रस्ट मंडळ शिबिरात अध्यापक म्हणून शिबिराचे आयोजक श्री ह भ प अशोक जी महाराज लोंढवेकर, कुशल मार्गदर्शक गजानन महाराज पवार, अक्षय महाराज नाणेकर, ज्ञानेश्वर महाराज पवार, रोहित महाराज सिसोदिया, जयेश महाराज पाटील, विठ्ठलदास महाराज, शुभम महाराज व गौरव महाराज या सर्वांची उपस्थिती होती
सांगतेच्याप्रसंगी गुरुवर्य परमेश्वर जी बाबा जायभाये (अध्यापक जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी) यांच्या काल्याच्या कीर्तनाने समारोप झाला. उपस्थित अमळनेर शहराचे आमदार अनिल पाटील व माजी आमदार स्मिताताई वाघ आणि अॅड. ललिता पाटील या सर्वांची उपस्थिती लाभली. विद्यार्थ्यांना मोलाच मार्गदर्शन केलं, अशी माहिती मंदिराचे ट्रस्टी वाय ए आप्पा यांनी दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपक पाटील वावडेकर यांनी केले.व डी. एम. बोरसे यांनी परिश्रम घेतले.