अमळनेर विधानसभा मतदार संघात शिवसेना मेळाव्यात शिवसैनिकांचा उत्साह…

शिवसैनिकांनी एकजुटीने भगवा फडकवण्यासाठी कामाला लागावे- सहसंपर्क प्रमुख आर.ओ.पाटीलअमळनेर– शिवसेनेत शिवसैनिक हा सर्वात महत्वाचा घटक असून,हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी व विधानसभेत आणि दिल्लीच्या तख्तात भगवा फडकविण्यासाठी कामाला लागावे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आदेशानुसार स्वबळावर निवडणुकीचे आदेश असल्याने आता
शिनिवसैनिकांनी कामाला मरगळ झटकत कामाला लागण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जळगाव लोकसभेचे सहसंपर्क प्रमुख तथा पाचोरा विधानसभेचे माजी आमदार आर ओ पाटील यांनी केले.
अमळनेर विधानसभा मतदार संघातील शिवसेनेच्या बुथप्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख यांच्या मेळाव्यात अन्नपूर्णा मंगल कार्यालयात ते बोलत होते.यावेळी मंचावर जळगाव जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ,उपजिल्हाप्रमुख राजेंद्र पिंगळे, तालुका प्रमुख विजय पाटील, शहरप्रमुख प्रताप शिंपी,तालुका संघटक संजय पाटील,माजी शहर प्रमुख नितीन निळे,उपशहर प्रमुख जीवन पवार,विधानसभा क्षेत्र प्रमुख किरण पवार,  कृषी उ बा समिती चे संचालक रोहिदास पाटील,शिक्षक सेनेचे तालुका संघटक संदीप बोरसे,वैद्यकीय सेना संघटक डॉ शशिकांत सोनार,उपतालुका प्रमुख -चंद्रशेखर पाटील, किशोर जिभाऊ पाटील, बी यु पाटील,अनिल बोरसे टेलर, उमराव पाटील,नगरसेवक संजय भिल,विलास पवार ,महिला आघाडीच्या शहर संघटक मनिषा परब, संगीता शिंदे, मनिषा शिंपी,कुसुम कुंभार, आरती चौधरी,
या मान्यवरांसह युवासेनेचे अनिल महाले, आकाश शिंपी,देवेंद्र देशमुख चंद्रशेखर भावसार मोहन भोई,गणेश मोरे ,विजय पाटील, यांसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी आर ओ पाटील शिवसैनिकांशी संवाद साधताना पुढे म्हणाले की की पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतंत्र निवडणुका लढणार असल्याचे सर्व शिवसैनिकांच्या मते जाहीर केले असून,संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना संघटना मजबुती चे कार्य सुरू आहे.त्याचाच एक भाग म्हणून जळगांव लोकसभेतील सर्व मतदार संघात असे प्रशिक्षण मेळावे आम्ही घेत असून अमळनेर चे भगवे वातावरण पाहून आनंद झाल्याचे त्यांनी सांगितले,शिवसैनिकांचा उत्साह पाहून अमळनेरात विधांनसभेचाही भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही असे वाटते, यासोबतच मा पक्षप्रमुखांनी राममंदिरा संदर्भात भाजपला दिलेला इशारा हा अयोध्या दौऱ्यातून दिसून येईलच, यावेळी त्यांनी उपस्थित शिवसैनिकांना प्रेरणादायी विचार सांगत तमाम  शिवसैनिक हीच माझी संपत्ती ह्या वाक्याची आठवण करून दिली.यावेळी जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ ह्यांनी अध्यक्षीय भाषणांत विशेष करून पाडळसरे धरण च्या संदर्भांत प्रलंबित प्रश्नांवर नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या मागणिकडे केलेल्या दुर्लक्षावर विद्यमान जलसंपदा मंत्र्यांच्या हलगर्जीपणा वर टीकास्त्र सोडले, तर अमळनेर तालुका पुन्हा जुने गतवैभव प्राप्त करेलच असा विश्वास व्यक्त केला, तालुकाप्रमुख विजय पाटील यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर हात घालत कर्जमाफीचा प्रश्न व कृषी मार्केट बाजार समितीच्या खरेदीवर ताशेरे झाडले, उपजिल्हाप्रमुख  डॉ राजेंद्र पिंगळे यांनी आपल्या प्रास्ताविकात मेळावा घेण्याची भूमिका स्पष्ट केली,सूत्रसंचालन नाना वाघ व स्वीय सहायक स्वामी पाटील यांनी केले, शिवसेना मेळावा यशस्वीतेसाठी धरमसिंग पाटील, गोराने सागर,कासार विजय, किरण चव्हाण, व सर्व तालुका पदाधिकारी यांनी मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *