खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

टपरीच्या आडोश्याला आकडा घेणाऱ्या जुगारीवर मारवड पोलिसांनी केली कारवाई

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील कळमसरे येथे लोकांकडून पैसे घेऊन टपरीच्या आडोश्याला आकडा घेणाऱ्या जुगारीवर मारवड पोलिसांनी कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथे लोकांकडून पैसे घेऊन जुगार मटका खेळ सुरू असून कारवाई करण्याचे आदेश सपोनि शितलकुमार नाईक यांनी दिले. त्यानुसार हेकॉ फिरोज बागवान, पोना सुनील तेली, पोकॉ राजेंद्र पाटील यांनी छापा टाकला असता बस स्टँड परिसरात सुदाम बारकु भील (वय 26) हा पान टपरीच्या आडोश्याला आकडा घेताना रंगेहाथ मिळून आला. त्याच्याकडून आकडा स्वीकारण्याचे साहित्य आढळून आले. पोकॉ राजेंद्र पाटील यांच्या फिर्यादीवरून मुं.जु. ॲक्ट १२ अ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पो.ना. सुनील तेली करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button