अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील जैतपीर येथील अल्पवयीन मुलीला फुस लावून पळविल्याची घटना २९ मे रोजी घडली आहे.
याप्रकरणी एका तरुणावर संशय असून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, दिनांक २९ मे रोजी सकाळी आईवडील बाहेर सरपण आणण्यासाठी गेले तसेच लहान भाऊ हा खेळण्यासाठी बाहेर गेला असल्याने १७ वर्षीय मुलगी घरी एकटी होती. दुपारी २ वाजता आईवडील घरी परतले असता मुलगी न दिसल्याने त्यांनी आजूबाजूला व नातेवाईकांकडे चौकशी केली असता कोणताही तपास न लागल्याने कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याची खात्री झाली. मूळचा पाळधी येथील व आता जैतपीर गावात राहणारा तरुण ही न दिसल्याने मुलीच्या आईवडिलांनी त्या तरुणावर संशय व्यक्त केला आहे. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारवड पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो.ना.सचिन निकम हे करीत आहेत.