अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यात भिलाली व ताडेपुरा येथे वेगवेगळ्या दोन घटनेत दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ३१ रोजी घडली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ताडेपुरा येथील रहिवासी टॅक्सीचालक राकेश चंद्रकांत सातपुते (वय ३५) याने ३१ रोजी पहाटे १:३० वाजेच्या सुमारास स्वतःच्या घरात छताच्या लोखंडी अँगलला सुताची दोरी बांधून आत्महत्या केली. भावाने अमळनेर पोलिसात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हेडकॉन्स्टेबल सुनील पाटील करीत आहेत. राकेशच्या पश्चात आई , वडील, पत्नी, भाऊ , मुलगा , मुलगी असा परिवार आहे.
भिलाली येथे अपंगाने संपवले जिवन
तर भिलाली येथे दोन्ही पायांनी अपंग असलेला गुलाब धनसिंग गिरासे (वय ४७) हा कामासाठी पूर्णपणे पत्नीवर अवलंबून होता. जीवनाला कंटाळून त्यांनी ३१ रोजी सकाळी साडे सहा वाजेपुर्वी बाभळीच्या झाडाला दोरी बांधून गळफास घेतला. इंद्रसिंग गिरासे यांनी मारवड पोलीस स्टेशनला माहिती दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हेडकॉन्स्टेबल किशोर पाटील करीत आहेत.