महिलेची छेडखानी केल्याप्रकरणी अमळनेर पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल…

अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर ताडेपूरा येथील विवाहित महिलेल्या अज्ञात व्यक्तीकडून भ्रमणध्वनी देऊन अश्लील शिवीगाळ व खोट्या गुन्ह्याची धमकी देऊन रात्री अपरात्री येऊन पोलिसाने अंगलट करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार ताडेपुरा भागातील पालकाने पोलिसात केल्यावरून पोलिसाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान घटनेची सत्यता पडताळून पाहिली जात असल्याने सखोल तपास करण्यात येत असल्याचे पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी सांगितले
राजेश इबु कंजर यांनी अमळनेर पोलिसात फिर्याद दिली की पोलीस प्रमोद रघुनाथ बागडे यांनी आपल्या विवाहित मुलीला जवाई घरी नसताना अज्ञात व्यक्तीकडून दोन भ्रमणध्वनी पाठवून तिला अश्लील शिवीगाळ केली व खोटी गांज्याची केस करेल म्हणून वारंवार धमकी देत असे ३१ रोजी रात्री १० वाजता मुलीच्या घरी येऊन दरवाजा ठोठावून तिच्याशी अंगलट करण्याचा प्रयत्न केला यावरून अमळनेर पोलिस स्टेशनला पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद बागडे यांच्या विरुद्ध ४५१,३५४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पो.नि.अनिल बडगुजर करीत आहेत.
दरम्यान घटनेची सत्यता पडताळून पाहण्यासाठी पोलिसांनी महिला व पोलीस कॉन्स्टेबल यांच्या भ्रमाणध्वनीचे सी डी आर मागवले आहेत तसेच महिला दक्षता समिती समक्ष इनकॅमेरा महिलेचे जबाब घेण्यात आले आहेत या प्रकरणातील सत्यता पडताळून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे पोलीस निरीक्षक बडगुजर यांनी सांगितले.
दरम्यान इनकॅमेरा जबाब देऊन महिला घरी गेल्यानंतर तिने गळफास घेण्याचा प्रयत्न केल्याचे समजते तिने गळफास कोणाच्या दबावामुळे घेतला का याबाबत शहरात चर्चा सुरू होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *