ग्रामीण महिलांनी सक्षमतेकडे वाटचाल करावी -सारीका डफरे

एक दिवशीय कार्यशाळा : ज्ञानवर्धिनी फाउंडेशनतर्फे ग्रामीण भागातील महिलांना मार्गदर्शन..अमळनेर ग्रामीण भागातील महिलांमध्येही वेगवेगळ्या प्रकारचे सुप्त कौशल्य असून त्या कौशल्यांचा उपयोग केल्यास स्वत:ची तर प्रगती होईलच शिवाय कुटुंबाचीही प्रगती होण्यास मदत होईल. विशेष म्हणजे महिलांच्या या सुप्त कौशल्यांना उजाळा देण्याचे काम अमळनेर येथील ज्ञानवर्धिनी फाउंडेशन ही सेवाभावी संस्था गेल्या पाच-सहा वर्षापासून अविरत प्रयत्न करत असून या संस्थेच्या मदतीने ग्रामीण भागातील महिलांनी सक्षमतेकडे वाटचाल करावी असे प्रतिपादन दंतोपंत ठेंगडी कामगार श्रमिक शिक्षण व विकास बोर्डच्या शिक्षणाधिकारी सारिका डफरे यांनी केले.
दि. १ नोव्हेंबर रोजी आयोजित कामगार श्रमिक शिक्षण व विकास बोर्ड, नाशिक व ज्ञानवर्धिनी फाउंडेशन, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय पुन:प्रशिक्षण ग्रामीण कामगार कार्यशाळेत त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाचे उद्घाटन जळगांव पीपल्स बँक, अमळनेर शाखा व्यवस्थापक रणजित राणे, प्रा. प्रितम पंजाबराव सावंत, पंडित जवाहरलाल नेहरु समाजकार्य महाविद्यालयाच्या प्रा. श्वेता वैद्य, सेंट्रल बॅँकेचे सहायक शाखा व्यवस्थापक नितिन शेंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित महिलांना रणजित राणे यांनी नेटबॅकिंग तसेच महिलां साठीच्या उद्योग वाढीसाठी बचत गटांच्या स्टॉल संदर्भात मार्गदर्शन  केले, प्रा. श्वेता वैद्य यांनी ग्रामीण भागात घरगुती उद्योगासाठी बचत गटांचे महत्त्व विशद केले तर नितीश शेंडे यांनी बॅँकिंग आणि महिला बचत गट यांविषयी समस्या आणि उपाय योजना याविषयी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेचा अंतुर्ली, रंजाणे, खापरखेडा, पिंपळी, कोंडावढ, धानोरा तसेच सुंदरपट्टी आदी गावातील सुमारे ५५ महिलांनी लाभ घेतला. कार्यक्रमाचा समारोप अंतुर्ली रंजाणेच्या लोकनियुक्त सरपंच शितल सचिन पाटील यांनी केला. तर यशस्वीतेसाठी ज्ञानवर्धिनी फाउंडेशनच्या सचिव राजश्री पाटील आणि स्वयंसेवक शामकांत सोनवणे व गोविंदा साळुंके यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *