सरदार वल्लभाई पटेल जयंतीनिमित्त पाडळसरेत मिरवणूक, राष्ट्रीय एकात्मता दिवस म्हणून ढोल ताशे व फटाक्यांची आतषबाजीत फेटा बांधून गुर्जर युवकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग

सरदार वल्लभभाई पटेल जयती मिरवणूकीला सुरुवात करतांना नवयुवक गुर्जर मडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ

पाडळसरे ता.अमळनेर स्वतंत्र भारतातील सर्व संस्थाने एकत्र करणारे अखंड भारताचे शिल्पकार व पहिले उपपंतप्रधान लोहपुरूष सरदार वल्लभाई पटेल यांच्या १४३ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकात्मता दिवसाचे आयोजन पाडळसरेत सरदार पटेल नवयुवक मित्र मंडळ व समस्त गुर्जर युवा मंच तर्फे ढोल ताशे, आकर्षक रोषणाईने फटाक्यांची आतीष बाजी करून सजविलेल्या ट्रक्टर वर सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
हनुमान मंदिर चौकात राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्र प्रमुख भागवत गुर्जर, सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष पत्रकार वसंतराव गुर्जर, उपसरपंच प्रभाकर गुर्जर, माजी सरपंच सचिन गुर्जर, रमेश गुर्जर, राष्ट्रवादी किसान सेलचे तालुका अध्यक्ष विकास गुर्जर, विकास सोसायटीचे चेअरमन मगलताथ्या गुर्जर, शिवसेनेचे उपतालुका प्रमुख चद्रशेखर गुर्जर, रणछोड गुर्जर या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल याची प्रतिमा पुजन व माल्यार्पण करून अभिवादन करत मिरवणुकीला सुरुवात झाली . गावातील घराघरातून आरत्या झाल्या.
मिरवणूकीत” जय सरदार” घोषनानी गाव दनानून गेले. गावात भगव्या पताका व ध्वज लावल्याने व सरदार पटेल नवयुवक मडळाचे कार्यकर्त्यांनी फेटे परिधान करून विविध नृत्य नाटिका सादरीकरण करून वातावरण देशभक्तीपर निर्माण करून मिरवणूकीत उत्साह वाढवला. सदीप गुर्जर, सुधाकर गुर्जर,मगल गुर्जर, ईश्वर गुर्जर, मधुकर गुर्जर,सजय गुर्जर,बटी गुर्जर, रामाकृष्ण गुर्जर, जितेंद्र पाटील, भुषण पाटील, हेमंत पाटील, जगदीश भदाणे,  सुखदेव कोळी, विश्वास कोळी, गणेश कोळी, राहुल पाटील यानी मिरवणूकीत शांततेसाठी सहकार्य केले. सरदार पटेल जयंती उत्सव समितीचे राकेश गुर्जर, बाळासाहेब गुर्जर, निलेश गुर्जर, गौरवकुमार गुर्जर,चद्रकात गुर्जर,दिपक गुर्जर, अलोक गुर्जर, लोकेश गुर्जर, चरणसिंग गुर्जर, खेडिभोकरीकर गिरीश गुर्जर,ऋषीकेष गुर्जर,अक्षय गुर्जर, धिरज गुर्जर, निलेश, पाटील, पिटु गुर्जर,राधेश्याम गुर्जर, सागर कोळी आदींनी परिश्रम घेतले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *