मुख्याध्यापिका सरला २२कर यांची केंद्रप्रमुख विरुद्ध महीला आयोगाकडे तक्रार…

अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर येथील गोकुळ आनंदा पाटील हे अमळनेर प.स. चे गडखांब केंद्र प्रमुख आहेत व त्यांनी आपला मानसिक छळ चालविला असल्याची तक्रार मुख्याध्यापिका सरला २२कर यांनी वरीष्ठ अधिकारिंचा व महिला आयोगाचा दरवाजा ठोठावला आहे.
पातोंडा येथील जिल्हा परिषद (मुलांची) शाळेच्या मुख्याध्या पिका  सरला अर्जुन बाविस्कर यांनी राज्य महिला आयोगाकडे त्या बाबत तक्रार केली आहे. संबंधित केंद्र प्रमुखांच्या छळाला या केंद्रातील अनेक महिला शिक्षिका कंटाळल्या आहेत व गोकुळ आनंदा पाटील यांच्या छळाबाबत वरिष्ठांकडे तक्रार अर्ज केले तरी त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने शेवटची आशा म्हणून महिला आयोगाकडे तक्रार केल्याचे त्यांनी तक्रार अर्जात म्हटले आहे.
शिक्षणाधिकारी व वरिष्ठ या बाबत लक्ष का घालत नाही
हे आर्थिक छळाचे प्रकरण आहे की यातही “mitoo” चा संदर्भ येईल हे चौकशी अंती समजेल.
तूर्तास गोकुळ आनंदा पाटील यांनी केलेला मानसिक छळ खरा की खोटा?, त्यास कुणाची फूस आहे की आणखी वेगळे राजकारण आहे हे चौकशी अंती समोर येईल सध्या तरी उलट सुलट चर्चेस उधाण आले आहे.

सरला बाविस्कर यांनी दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, पातोंडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणून पदभार घेण्याच्या आधी शाळेच्या आवारात चार च जीर्ण खोल्या उभ्या होत्या, मात्र केंद्रप्रमुख गोकुळ पाटील हे शाळेच्या सहा खोल्या जीर्ण झाल्याने त्या पाडण्याचा शिक्षण विभागाचा आदेश असून त्या पाडण्यासाठी दबाव आणतात. सहा पैकी दोन खोल्या स्वतः केंद्रप्रमुख पाटील यांनी च पाडल्याचा आरोप बाविस्कर यांनी केला आहे. अस्तित्वात नसलेल्या दोन खोल्या मी कुठून पाडू असा प्रश्न केल्यास पाटील असंसदीय भाषा वापरतात असे तक्रार अर्जात म्हटले आहे. इतकेच नव्हे तर  यासाठी शिक्षण विस्ताराधिकारी महाजन याना देखील केंद्र प्रमुख पाटील शाळेवर घेऊन येतात व माझ्यावर दबाव आणतात. तसेच या केंद्रप्रमुखाने गडखांब केंद्रातील अनेक महिला शिक्षकांना मानसिक त्रास दिला आहे त्यापैकी चार महिला शिक्षिका ची नावे  तक्रार अर्जात नमूद करत या चार ही शिक्षिका या केंद्र प्रमुख विरुद्ध चौकशी झाल्यास बोलायला तयार असल्याचे मुख्याध्यापिका सरला बाविस्कर यांनी तक्रार अर्जात म्हटले आहे.

खोल्या पाडण्याचे सीईओ चे आदेश आहेत. केन्द्र प्रमुख खोल्या पाडण्याचे काम करत नाही, मी त्या दोन खोल्या पाडल्या हे मुख्याध्यापिका यांनी सिद्ध करावे, अन्यथा मी अब्रू नुकसानीचा दावा दाखल करेल, तसेच ज्या महिला शिक्षिकांना काम करायचे नसत त्या आरोप करतात. 
गोकुळ आनंदा पाटील केंद्रप्रमुख गडखांब

मी पातोंडा येथे केवळ शाळा भेट देण्यासाठी च गेलो होतो, मला कोणी तिथे नेले नाही. शासन आदेश असल्याने च आपण सहा खोल्या पाडण्याचा शेरा लिहला आहे. 
आर.डी.महाजन शिक्षण विस्तार अधिकारी प स अमळनेर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *