सरस्वती विद्या मंदिर शाळेत लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती साजरी….

अमळनेर शहरासह  तालुक्यात विविध ठिकाणी जयंती साजरी.अमळनेर( प्रतिनिधी) अमळनेर येथिल सरस्वती विद्या मंदिर शाळेत लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी जयंती साजरी करण्यात आली.”सरदार पटेलांनी निश्चयीवृत्तीने खंबीरपणे देश एकसंघ केला!”असे कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक रणजित शिंदे यांनी सांगितले.
भारताचे पहिले गृहमंत्री तथा लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस यावेळी मुख्याध्यापक रणजित शिंदे, यांचेसह उपशिक्षक आनंदा पाटिल,सौ.संगिता पाटिल, सौ.गीतांजली पाटिल आदिंनी पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पूजन केले. विद्यार्थ्यांना सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनकार्याचा परिचय याप्रसंगी करून देण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक परशुराम गांगुर्डे यांनी तर सूत्रसंचालन धर्मा धनगर यांनी केले.आभार ऋषिकेश महाळपूरकर यांनी मानले. विद्यार्थ्यांनीही सरदार पटेल यांच्या प्रतिमेस वंदन केले. यावेळी सौ.संध्या ढबू व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.अमळनेर-लोंढवे येथील स्व.आबासो एस.एस.पाटील माध्यमिक विद्यालय लोंढवे येथे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती साजरी करण्यात आली व मा.पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले. तसेच राष्ट्रीय एकता दिनाची शपथ घेण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक बाळासाहेब जिवन पाटील, व शिक्षक,शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अमळनेर तालुका व शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वर्गीय मा.पंतप्रधान प्रियदर्शनी इंदिराजी यांची पुण्यतिथी व स्वर्गीय लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करण्यात आली. या जयंती औचित्त साधून अमळनेर तालुका महिला अध्यक्षपदी सौ.लताताई रवींद्र पा.रा.निंबोरा ता.अमळनेर यांची निवड जळगाव जिल्हा महिला अध्यक्षा सुलोचना ताई वाघ यांनी आज केली. यावेळी कार्यक्रमास अध्यक्ष जिल्हा महिला काँग्रेस – सुलोचना ताई वाघ,अध्यक्ष अमळनेर तालुका काँग्रेस-गोकुळ बोरसे, शहरध्यक्ष मनोज पा.डॉ. अनिल शिंदे, सुरेश पिरन पा.,शांताराम शामराव पा.,सुभाष पा.,ठाकरे सर ,चंद्रकांत शर्मा,प्रियाल पा.,लताबाई रवींद्र पा. तालुकाध्यक्ष महिला काँग्रेस,के.व्ही पा. सर, अमळनेर कार्यकर्ते हजर होते.अमळनेर येथील पर्ल इंटरनॅशनल स्कूल,अमळनेर येथे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती साजरी करण्यात आली व मा.पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले. तसेच राष्ट्रीय एकता दिनाची शपथ घेण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *