खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

अवैध वाळू व गौण खनिज वाहतूक करणाऱ्या १५ वाहनांवर कारवाई

महसूल विभागाने दिली ७ लाख ३७ हजार ८६५ रुपयांच्या दंडाची नोटीस

अमळनेर (प्रतिनिधी) अवैध वाळू व गौण खनिज वाहतूक करणाऱ्या १५ वाहनांवर महसूल विभागाने कारवाई केली. त्यांना ७ लाख ३७ हजार ८६५ रुपयांच्या दंडाची नोटीस देण्यात आली आहे. वाहने पोलीस स्टेशनला जमा करण्यात आली आहेत. यामुळे खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गोपाळ किसन पाटील यांचा टेम्पो (क्रमांक एम एच ०५ एजी ६३८१) , संदीप जगन्नाथ पारधी यांचे ट्रॅक्टर (क्रमांक एम एच १९ सी जे १४०२) , ट्रॉली (क्रमांक एम एच १९ ,५९५८), राहुल काशिनाथ शिंपी यांचे टेम्पो (क्रमांक एम एच ०२ , एच ए ६२६५) , भूषण दिपक धनगर यांचा टेम्पो (क्रमांक एम एच ०५ , ९१२२) , जयेश युवराज पाटील यांचा लाल रंगाचा बिना नंबरचा टेम्पो , ललित कैलास पाटील (एम एच ०१ एल ए ३०३३ , मुनाफ पठाण यांचे ट्रॅक्टर एम एच १९, बी जी ५४०), ट्रॉली (क्रमांक एम एच १९ इ ३४२३) , विश्वास संतोष पाटील यांचे ट्रॅक्टर (क्रमांक एम एच १९ , बिजी ६४०२) , अकबरखा युसुफखा पठाण यांचे ट्रॅक्टर( क्रमांक एम एच २१ ए डी ३७८५) , भैय्या शांताराम पाटील यांचे ट्रॅक्टर (क्रमांक एम एच १९ , ए एल ४४६०) , आकाश शिंपी यांचे ट्रॅक्टर (क्रमांक एम एच १९ ,सी इ १६७६) ,धनराज मधुकर पाटील यांचा बिना नंबर टेम्पो , हेमंत राजेंद्र पवार यांचे ट्रॅक्टर (क्रमांक एम एच १९ , सी यु १७४७) , शेख वहाब गफूर यांचा टेम्पो (क्रमांक एम एच ०२ ,बी ९९०७) , मुकद्दर अली जोहर अली (एम एच ०२ वाय ३४८१) या वाहनांना अवैध वाळू वाहतूक व गौण खनिज वाहताना तलाठी पथकाने रंगेहाथ पकडून वाहने पोलीस स्टेशनला जप्त करण्यात आले आहेत. तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी सर्व वाहनांना एकूण सात लाख ३७ हजार ८६५ रुपयांच्या दंडाची नोटीस दिली असून तीन वाहनांनी दंड भरल्याने त्यांची मुक्तता करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button