खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

डॉ. आंबेडकर नगरपरिषद कर्मचारी पतपेढीत आशीर्वाद पॅनलचे वर्चस्व

अमळनेर (प्रतिनिधी) येथील डॉ. आंबेडकर नगरपरिषद कर्मचारी पगारदार पतसंस्था (मर्या)अमळनेर च्या नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत आशीर्वाद पॅनल ने सर्व जागांवर विजय मिळवित वर्चस्व प्राप्त केले.
माजी नगरसेवक तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र रामभाऊ संदानशिव यांच्या नेतृत्वात हा विजय पॅनल ने मिळविला. सात जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत अविनाश रामभाऊ संदानशिव, रोहित संजय बि-हाडे,परम गोपीचंद चव्हाण, सिध्दार्थ सुनील मोरे ,भैय्या सुरेश बि-हाडे राजरत्न भरत सोनवणे, सचिन दगडु ढिवरे हे सात उमेदवार विजयी झाले तर यापूर्वी याच पॅनलचे भाऊसाहेब नामदेवराव पाटील, रेखा काशिनाथ संदानशिव व जया भरत सरदार हे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले होते.दि 14 रोजी ही निवडणूक पार पडून सायंकाळी लगेच निकाल घोषित करण्यात आला,निकाल जाहीर झाल्यानंतर आशीर्वाद पॅनल च्या समर्थक आणि कर्मचाऱ्यांनी जल्लोष साजरा केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button