अमळनेर(प्रतिनिधी) विकासाच्या प्रक्रियेत सामाजिक शास्त्रांची भूमिका महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे मानव्यविद्या शाखा विभागाचे अधिष्ठाता प्रा.डॉ प्रमोद पवार यांनी येथील प्रताप महाविद्याल याच्या सामाजिक शास्त्र मंडळाच्या उदघाटन प्रसंगी केले. येथील प्रताप महाविद्यालयात समाजशास्त्र मंडळाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ ज्योती या उपस्थित होत्या.
यावेळी व्यासपीठावर प्रा डॉ एल एल मोमाया, डॉ डी एन वाघ, प्रा डॉ जी एच निकुंभ , सामाजिक शास्त्र समन्वयक प्रा डॉ संदीप नेरकर उपस्थित होते.यावेळी समाज शास्त्र मंडळ उद्घाटन प्रा डॉ प्रमोद पावर यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमात प्रा डॉ प्रमोद पवार यांनी समाजशास्त्राची सद्यस्थितीतील व्यवहार्यता या विषयावर बोलताना सांगितले की माणसाने कितीही भौतिक प्रगती केली तरी समाजशास्त्राची उपयुक्तता कमी होत नसल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. समाज धारणा व समाज सुदृढतेसाठी सामाजिक शास्त्रांच्या आवश्यकता असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले समाजात मूल्यांची रुजवण करण्यासाठी सामाजिक शास्त्रांची व्यवहार्यता आहे प्राचार्य ज्योती राणे यांनी समाजाच्या स्वास्थ्यासाठी व विज्ञान विज्ञान-तंत्रज्ञानाच्या सायने केलेल्या प्रगतीचा वापर कशा रीतीने करावा व समाज उपयोगी कसा करावा हे चालण्यासाठी समाजशास्त्राची अपरिहार्यता असल्याचे मत यावेळी व्यक्त केले या कार्यक्रमाप्रसंगी कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे अभ्यास मंडळाच्या सदस्यांचा यावेळी गौरव करण्यात आला इतिहास विषयाचे अभ्यास मंडळा चे अध्यक्ष डॉ डी एन वाघ, सदस्य प्रा डॉ डी आर चौधरी, राज्य शास्त्राचे सदस्य प्रा डॉ व्ही एस तूंटे, तत्त्वज्ञान चे सदस्य प्राध्यापक माधव भुसनर आदींचा यावेळी गौरव करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन प्रा डॉ संदीप नेरकर यांनी केले यावेळी प्रा विजय साळुंखे व आभार भुसनर यांनी केले.