खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

रोटरी क्लब अमळनेरचा ‘चार्टर्ड डे’ विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा

अमळनेर (प्रतिनिधी) रोटरी क्लब अमळनेरच्या चार्टर्ड डे अर्थात ६७वा संस्थापन दिन दिनांक ९मे रोजी प्रताप तत्त्वज्ञान केंद्र येथे उत्साहात झाला.
याप्रसंगी” मी अनुभवलेली रोटरी “या विषयावर सर्व उपस्थित माजी रोटरी अध्यक्षांनी आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रोटे गनी मेमन माजी असिस्टंट गव्हर्नर जळगाव, रोटे आशिष गुजराथी माजी असिस्टंट गव्हर्नर, चोपडा, रोटेरियन भोळे माजी असिस्टंट गव्हर्नर जळगाव व रोटे अनिल अग्रवाल चोपडा, पी आर ओ मकसूद बोहरी व आशिष चौधरी उपस्थित होते. या प्रसंगी सर्व माजी अध्यक्षांच्या यथोचित सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला होता. याप्रसंगी प्रमुख पाहुणे रोटे गनी मेमन यांनी आपले संभाषणात सांगितले की काही प्रसंगी पद,पैसा आणि प्रतिष्ठा कामात येत नाही हे आपण कोविड काळात अनुभवलेले आहेच तर आपण जोडलेली माणसं मित्रपरिवार हे फार मोठे काम करून जात असते तरी रोटरी ही बंधुभाव आणि मित्र वाढविणारी संघटना असून त्याचे आपण जास्तीत जास्त उपयोग करून सामाजिक ऋण फेडण्याचे योगदान करावे असे त्यांनी सुचविले. याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांना गनी मेमन यांना डॉ.शरद बाविस्कर यांनी त्यांचे काढलेले चित्र सप्रेम भेट दिले. याप्रसंगी सीनियर रोटेरियन शशांक जोशी वअनिल भाई शाह यांच्या हस्ते चार्टर्ड डे निमित्ताने केक कापण्यात आला. या प्रसंगी रोटेरीयन्स मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ताहा बुकवाला व सूत्रसंचालन अजय रोडगे तर आभार प्रदर्शन प्रेसिडेंट रोटेरियन कीर्तीकुमार कोठारी यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button