खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य कृषी विकास महामंडळ शेतकऱ्यांसाठी घेऊन आलेय दर्जेदार कीटकनाशके!

महानोवा जीए, महानोवा टीआर महानीम शेतकऱ्यांसाठी संजीवनी

कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली, कृषी आयुक्त तथा व्यवस्थापकीय संचालक सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाने दुसऱ्या हरीत क्रांतीकडे वाटचाल

खान्देश (प्रतिनिधी) महाराष्ट्राच्या शेतकर्‍यांच्या उन्नतीसाठी आणि दुसर्‍या हरित क्रांतीसाठी महाराष्ट्र शासनाचा अंगिकृत व्यवसाय म्हणून महाराष्ट्र राज्य कृषी विकास महामंडळ दर्जेदार असे महानोवा जीए, महानोवा टीआर आणि महानीम कीटकनाशके घेऊन आले. यातून कीटकनाशकांचा नाशच नव्हे तर उत्पादन वाढीस ही फायदेशीर आहे, म्हणूनच आता खऱ्या अर्थाने दुसर्‍या हरित क्रांतीची सुरुवात महाराष्ट्र शासनाचा अंगिकृत व्यवसाय दुसऱ्या हरित क्रांतीकडे व जैविक शेतीकडे वाटचाल करीत आहे. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली, कृषी आयुक्त तथा व्यवस्थापकीय संचालक सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाने या महामंडळाने दुसऱ्या हरीत क्रांतीकडे वेगाने वाटचाल सुरू केली आहे.
सुग्रास गोशक्ती गायींसाठी सुग्रास म्हशीसाठी सर्वोत्तम सुग्रास…!!!! बळिराजाच्या मुलांसाठी नोगा जाम मार्मालेड केचअप इत्यादी पीकावर रोग आल्यास फवारायची कीटकनाशके कडुनिंबापासून बनवलेली आहेत.
महानीम३००० पीपीएम हे निंबोळीपासून बनवलेले औषध सीआयबी मान्यताप्राप्तच आहे. ते मारल्याने कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव १००% रोखतां येईल. केळीवरील करपा अन्य आजार रोखता येतील. केमिकल नसल्याने केळी व कापूस निर्यात सुद्धा करता येईल.भविष्यात होणार्‍या कॅन्सरपासून लोकांना वाचवता येईल.

 

काय आहे महानोवा जीए आणि महानोवा टीआर..

महानोवा जीए हे सी.आय.बी रजिस्टर्ड उत्पादन आहे. तसेच नॅनो टेक्नॉलॉजीयुक्त असून अवघ्या 72 तासात पिकांवर रिझल्ट दाखवून देते. ‘ महा नोवा जीए मध्ये प्रामुख्याने जिब्रेलिक अॅसिड 0.001% सोबतच उपलब्ध स्वरूपातील प्रथिने, समुद्री शेवाळाचा अर्क तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांचा समावेश आहे. पिकांच्या शाखीय वाढीसाठी, अधिक फुटव्यांसाठी आणि दर्जेदार उत्पादन मिळवण्यासाठी महानोवा जीए अतिशय उपयुक्त ठरते. बियाणांची सुप्तावस्था मोडून एकसमान व जलद अंकुरणासाठी महा नोवा जीए फायदेशीर आहे. महा नोवा जीए सूक्ष्म अन्नद्रव्यांचा परिपूर्ण स्रोत असून विविध आवश्यक अन्नद्रव्यांची पूर्तता करते. पिकाच्या सुदृढ वाढीसह रोगप्रतिकारशक्ती देखील वाढविते महा नोवाजीए चा’ वापर पिकांवर केल्याने उत्पादनामध्ये 20 ते 25% वृद्धी होते. कापसावरती याची फवारणी केली तर कापसाच्या धागेची लांबी वाढते आणि सेंद्रिय कापसाची निर्मिती होते. त्यामुळे प्रदेशातही सुद्धा सेंद्रिय कापूस निर्यात करणे महाराष्ट्राला शक्य आहे. तसेच महानोवा टीआरमुळे बोंडांची संख्या दुप्पट वाढू शकते. केळीची गुणवत्ता व चव वाढेल आणि एका घडात चाळीस डझन पर्यंत केळी येऊ शकतात. बळिराजाने हे वापरावे व उत्पन्न वाढवावे. यातून स्वताच्या उन्नतीसह राज्याच्या प्रगतीचा एक धागा व्हावा, यातून राज्यासह देशाची प्रगती होईल.

शेतकर्‍यांनी या किटकनाशकांचा जास्तीत जास्त नोंदणी करावी

खानदेशात कापूस, केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्यामुळे या पिकांसाठी महानोवा जीए व महनोवा टीआर व महानीमह ३००० ppm उत्पादन वाढीसाठी अतिशय फायदेशीर आहे. म्हणून या कृषी उद्योगच्या उत्पादनांची मागणी शेतकऱ्यांनी दुकानदारांकडे नोंदवावी जेणे करुन येणाऱ्या या हंगामात महाराष्ट्र कृषी उद्योग महामंडळ ते खात्रीशीर कमी भावात उपलब्ध करुन देऊ शकेल. कारण महाराष्ट्राचे कृषी उद्योग महामंडळ आपल्या शेतकर्‍यांच्या सेवेसाठी आहे…..

ज्योती देवरे, उपमहाव्यवस्थापक (प्रशासन), कृषी उद्योग विकास महामंडळ,मुंबई

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button