संयुक्त कारवाईत दारूच्या हातभट्ट्या केल्या उध्वस्त… अमळनेर “डांगरी” गावात ‘डांगट’ यांची प्रथम कारवाई.अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील प्रगणे डांगरी व सात्री येथील बोरी नदी किनारी दारूबंदी विभागाला डोळ्यांना कधीही न दिसणार काटेरी झुडपांमधील भागात चोरून लपून चालत असलेल्या गावठी दारुच्या हातभट्टया, रसायनासह अमळनेर राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलिस उपविभागिय अधिकारी,मारवड पोलिसांची संयुक्त कारवाईत उध्वस्त केले.
या कारवाईने ग्रामस्थासह महिला वर्गात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
काल ता.२९ रोजी प्रगणे डांगरी व सात्री येथील महिलांनी अमळनेर येथील उपविभागीय पोलिस अधिकारी रफीक शेख व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक रिंकेश डांगट यांना गावातील दारू बंदी बाबत निवेदन देऊन मागणी केली होती.
या पार्श्वभूमीवर महिलाच्या मागणी प्रकरणाची दखल घेत ३० रोजी मंगळवारी मारवड पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक समाधान पाटील, पो.उप नि. निलेश शेबडे,स.पो.उप नि. श्रीराम पाटील, संजय पाटील, सोनवणे व डांगरी गावाचे पोलीस पाटील आणि पंच यांना सोबत घेऊन डांगरी गावाच्या बोरी नदी काठी गावठी हात भट्टी दारू भट्टीवर धाड टाकित १४०० रुपये किमतीचा मुद्दे मालासह ७५०० रुपये किमतीचा रसायन उध्वस्त करून २ आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी भैय्या सीताराम वडार वय २८ आणि विलास धर्मा कोळी वय ३२ दोन्ही राहणार डांगरी यांना दारू बंदी कायदा गु.र .न ३७/१८ आणि ३८/१८ या गुन्ह्यात अटक करण्यात आली असून मा.कोर्टात न्यायालयीन कोठडी कामी हजर केले होते.
तसेच अमळनेर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक रिंकेश डांगट यांच्या पथकातील पोलीस हवालदार दिनेश पाटील,शशिकांत पाटील,राहुल सोनवणे यांना सोबत घेऊन डांगरी गावाच्या बोरी नदी काठी गावठी हात भट्टी दारू निर्मितीच्या भट्ट्यावर छापा टाकुन२६०० हजार रुपये किमतीचा मुद्देमाला सह ११३० रुपये किमतीचा रसायन उध्वस्त केले. एक आरोपी विरुद्ध दारू बंदी कायदाअतर्गत अमळनेर दारू उत्पादन शुल्कात त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी संदीप दत्तात्रय सैंदाणे वय २७ राहणार डांगरी यास रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. तर एक अज्ञात वक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून डांगरीसह सात्री गावात या धडक कारवाइने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून अवैधधंदे चालकांचे धाबे दणाणले आहे.