अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर शहर सह तालुक्यात हात भट्टी च्या सहाय्याने मोहा व सड़वा,नवसागर च्या माध्यमातून तयार करण्यात येणाऱ्या गावराण गावठी दारूचा व्यवसाय करणाऱ्या वर २८ सप्टेंबर रोजी ९ गावांना अमळनेर पोलिस उपविभागीय अधिकारी, तसेच अमळनेर पोलिस निरीक्षक,व जळगांव स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने तालुक्यातील वेगवेगळ्या ९ ठिकाणी छापे मारण्यात आले.
या बाबत सविस्तर वृत्त असे की अमळनेर पोलिस निरीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनात पोलिस पी.एस.आय.चातुरे, ए.एस.आय प्रभाकर पाटील, पोलीस नाईक किशोर पाटील, बापू साळुंखे, सुनील पाटील, रवी पाटील विजय साळुंखे यांनी बहादर पूर रोड कांजरवाडा येथून मीनाक्षी सुरज कंजर यांच्या कडून २५ हजार ७०० रुपयांचे १२०० लिटर कच्चे रसायन, २ हजार रुप यांची ४० लिटर दारू,सोनखेडी येथील जिजाबाई पंडित भिल हिच्याकडून ८ हजार १०० रुपयांचे २०० लिटर रसायन व ९०० रुपयांची २० लिटर दारू,हिंगोने खुर्द येथील हिलाल हरचंद भिल यांच्याकडून ४५०० रुपयांचे ३०० लिटर कच्चे रसायन व ३०० रुपयांची १५ लिटर दारू,मालखेडा येथील युवराज सुखदेव शिर साठ यांच्याकडून १६ हजार रुपयांचे ८०० लिटर कचे रसायन ४५० रुपयांची १० लिटर दारू, प्रलहाद पितांबर सोनवणे यांच्या कडून ८ हजर रुपयांचे ४०० लिटर कच्चे रसायन व ४५० रुपयांची १० लिटर दारू,पैलाड भोईवाडा येथील कृष्णकांत प्रभाकर शिरसाठ यांच्याकडून ३२० रुपयांची ८ लिटर दारू,गांधलीपुरा येथील भास्कर वामन बागुल यांच्याकडून १५० रुपयांची ८ लिटर दारू,रफिक खान लुकमान खान पठाण यांच्या कडून ३२० रुपयांची १० लिटर दारू,ताडेपुरा येथून कैलास अमृत भिल याच्या कडून ४५० रुपयांची २० लिटर गावठी हात भट्टी ची दारू असा एकूण ६२ हजार ३०० रुपयांचे २९०० लिटर कच्चे रसायन व ५४४० रुपयांची १३९ लिटर दारू असा ६७ हजार ७४० रुपयांचा माल जप्त करून ९ जणांविरुद्ध मुंबई पोलीस कायदा ६५ इ फ ब क प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आला आहे.
● “गावठी दारू कशी तयार करतात …?” ●
माहिती वाचण्याआधी हे लक्षात असू द्या की गावठी दारू उत्पादन,खरेदी, विक्री ह्यावर कायद्याने बंदी आहे.
●कशी तयार होते दारू?●
> हातभट्टी लावायची सुरुवात होते ती ‘मसाल्या’चे डबे जमिनीत गाडण्यापासून!
> डब्यात दारूचा ‘मसाला’ टाकला जातो. हा मसाला म्हणजे काळा गूळ,नवसागर, कुजलेली फळं, चपला, स्पिरीट,फ्रेंच पॉलिशपासून तर बॅटरीच्या सेलर्पयत काहीही.
> एकदा डबे गाडले की त्यावर दररोज हात मारायचा. म्हणजे पुरलेला डबा उकरायचा, झाकण काढून कोपरार्पयत हात आत घालायचा आणि ‘मसाला’ व्यवस्थित ढवळायचा.
> सलग चार-पाच दिवस, ‘शिट्टी’ वाजेर्पयत हात मारायचा. डब्याचं झाकण उघडताच सूùùù असा आवाज आला की समजायचं, झाला ‘मसाला’ तयार!
> हे मसाल्याचे डबे मोठय़ा पिंपात रिकामे करायचे, की झाली भट्टी लावायच्या कामाला सुरुवात..
> पिंपात तारेने एक अधांतरी थाळी बांधली जाते. त्यावर पितळी नळी आणि तिला जोडलेली रबरी नळी.
> पिंपाखाली लाकडं सारून ती पेटवायची. ‘मसाल्या’च्या पाण्याचं बाष्पीभवन होऊन ते पाणी थाळीवर पडतं आणि मग बाटलीत’.! झाली तयार पहिल्या धारेची दारू.!